मिरची लागवडीसाठी चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. हिरव्या मिरचीसाठी ज्वाला, एन. पी. - 46-ए या जाती, तर पिकलेल्या लाल मिरचीसाठी सी. ए. 960, पंत सी-1, जी-3, अग्निरेखा, तेजस, फुले सूर्यमुखी, फुले ज्योती, अर्का लोहित, कोकणकीर्ती या जातींची निवड करावी. उन्हाळी लागवडीसाठी ज्वाला आणि एन. पी. - 46 या जातींची निवड करावी. रोपवाटिकेत रोपे तयार करून 45 दिवसांनी पुनर्लागवड करावी. खरीप लागवड जून-जुलै, तर उन्हाळी लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करावी. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. जिरायती पिकाची लागवड 60 सें. मी. बाय 45 सें. मी. आणि ओलिताखालील पिकाची लागवड करताना 60 सें. मी. बाय 60 सें. मी. लागवड करावी. अधिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (टोल फ्री क्रमांक - 18002330724) येथे संपर्क साधावा. स्त्रोत: अग्रोवन