खरीप हंगामात जुलैचा पहिला आठवडा आणि उन्हाळी हंगामात जानेवारीचा तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड करावी. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून हेक्टरी 20 टन शेणखत मिसळावे. लागवडीसाठी फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका, अर्का अभय या जातींची निवड करावी. लागवडीसाठी हेक्टरी 15 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 25 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर आणि 25 ग्रॅम स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. लागवड 30 सें. मी. बाय 15 सें. मी. अंतराने करावी. या पिकाला माती परीक्षणानुसार लागवडीच्या वेळी हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश ही खत मात्रा द्यावी. लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची मात्रा द्यावी. दर 15 दिवसांनी खुरपणी करावी. संपर्क - 02426- 243861 कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. ------------------------------------------------------------------------------------------------- स्त्रोत: अग्रोवन