शेवग्याची लागवड सर्व प्रकारच्या हलक्या, माळरान, डोंगर-उताराच्या जमिनीत करता येते. लागवडीसाठी कोइमतूर-1, कोइमतूर-2, पीकेएम-1, पीकेएम-2 आणि कोकण रुचिरा या जाती निवडाव्यात. लागवड फाटे कलम किंवा बियांपासून करावी. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत शेवग्याची लागवड करावी. लागवड करताना दोन झाडातील अंतर 4 मीटर बाय 4 मीटर किंवा 5 मीटर बाय 5 मीटर ठेवावे. लागवडीसाठी 60 सें.मी. बाय 60 सें.मी. बाय 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणून त्यामध्ये खड्डा भरताना तळाशी कुजलेला काडी-कचरा, गवत, पाचट यांचा थर द्यावा. तसेच शेणखत एक घमेले, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व माती या मिश्रणाने खड्डा भरावा. पिकाला गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. लागवडीनंतर 8 ते 10 महिन्यांनी शेंगउत्पादन सुरू होते. संपर्क - 02452- 229000 कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी स्त्रोत: अग्रोवन