राजगुरुनगर (जि. पुणे) येथील कांदा व लसूण संशोधन संचालनालयाने दिलेली माहिती: लसूण लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत करतात. लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन हवी असते.

लागवडीपूर्वी शेतास आडवी -उभी नांगरणी करून, ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर वखरणी करून, चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी 20 ते 25 टन टाकावे. सपाट वाफ्यामध्ये 15 ु 10 सें.मी. अंतरावर चांगल्या मोठ्या आकाराच्या पाकळ्या लावून लागवड करावी. अशाप्रकारे हेक्टरी सहा क्विंटल पाकळ्या लागतात.

लागवडीसाठी गोदावरी, यमुना सफेद, श्वेता, ऍग्री फाउंड व्हाइट, फुले बसवंत या सुधारित जातींचा वापर करावा. माती परीक्षणानुसार हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. यापैकी अर्धे नत्र, पूर्ण स्फुरद व पूर्ण पालाश लागवडीच्या वेळी व राहिलेले अर्धे नत्र लागवडीनंतर 30 दिवसांनी द्यावे.

दर आठ ते बारा दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा पिकाच्या आवश्यकतेनुसार पाण्याचा कालावधी कमी-जास्त करावा. अधिक मार्गदर्शनासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
- 02135 - 222026
कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, जि. पुणे

स्त्रोत: अग्रोवन