जांभूळ लागवडीविषयी माहिती

जांभूळ लागवडीसाठी 10 बाय 10 मीटर अंतरावर एक मीटर बाय एक मीटर बाय एक मीटर आकाराचे खड्डे खणावेत. हे खड्डे माती व दोन घमेली चांगले कुजलेले शेणखत, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेटच्या मिश्रणाने एप्रिल-मे महिन्यात भरून घ्यावेत. चांगला पाऊस झाल्यावर कोकण - बहाडोली या जातीच्या कलमांची लागवड करावी. या जातीची फळे मोठी आहेत. फळांचा रंग गर्द जांभळा असून, फळे चार दिवस चांगली टिकतात. फळांचे उत्पादनही चांगले मिळते.

लागवडीनंतर

आळ्यात वाळलेल्या गवताचे आच्छादन करावे. झाडाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. पूर्ण वाढ झालेल्या पाच वर्षांच्या झाडास पाच घमेली चांगले कुजलेले शेणखत, एक कि.ग्रॅ. युरिया, दीड कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट, 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आळ्यात मिसळून द्यावे. कलमांची भटक्या जनावरांपासून काळजी घ्यावी.

कलमांच्या लागवडीबाबत अधिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी (02358 - 280233, 280238) यांच्याकडे संपर्क साधावा.

एस. जी. साळुंखे, राधानगरी, जि. कोल्हापूर

माहिती संदर्भ : अॅग्रोवन