महाराष्ट्राची मोसंबी देशात सर्वदूर परिचित आहे . महाराष्ट्रात ८५,००० हेक्टर क्षेत्रापैकी ३५००० हेक्टर क्षेत्रातील मोसंबी पीक उत्पादन देत आहे. इतर क्षेत्र नवीन लागवडीसाठी असल्यामुळे फळासाठी आलेले नाही . फक्त क्षेत्र वाढवून उपयोग नाही. उत्पादकता वाढविण्यासाठी योग्य बहार धरणे, बागेची योग्य मशागत करणे व खताचा योग्य वापर तसेच कीड व रोगाचा बंदोबस्त करणे याकडे लक्ष दिले जात नाही. त्याचबरोबर खताच्या त्यामुळे उत्पादकता अतिशय कमी (१० ते १२ टन/हे.) आहे. याउलट प्रगत देशाची उत्पादकता ही २५ टन प्रति हेक्टरपर्यंत आहे. मोसंबीमध्ये मुख्यतः तीन बहार घेतले जातात. त्यामध्ये मृग बहार (जून-जुलै), हस्तबहार (सप्टेबर-अॉक्टोबर्) आणि आबे बहार (जानेवारी-फेब्रुवारी) असे वर्गीकरण केले जाते. येणा-या जूनमध्ये मृग बहार घेण्याकरिता आपणास काही ठरावीक बाबीचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये ताण देण्याचा कालावधी, फुले येण्याचा काळ व फळ काढणी हे प्रमुख घटक आहेत. मृग बहरामध्ये झाडांना ताण देण्याचा काळ हा एप्रिल ते मे असून ताणचा कालावधी जमिनीच्या प्रकारानुसार ठरविण्यात आलेला आहे. हलक्या जमिनीमध्ये साधारणपणे २५ ते ३५ दिवस ताण द्यावा. ताण देणे म्हणजे झाडाचे पाणी बंद करणे. मृग बहारमध्ये ताण दिल्यानंतर फुले येण्याचा कालावधी जून-जुलै असा आहे. साधारणपणे जून महिन्यामध्ये पावसाच्या आगमनाबरोबर झाडांना दिलेला ताण तुटतो व झाडांना मृगबहाराची फुले लागतात. परंतु बदलत्या हवामानामध्ये जूनमध्ये जर पावसाने खंड दिला तर ताण तोडण्यासाठी आपल्याला झाडांना पाणी देणे आवश्यक आहे. फुलधारणा झाल्यानंतर साधारणपणे नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये फळे पक्र होऊन काढणीस तयार होतात. मृग बहारामध्ये फळे काढणीचा कालावधी फेब्रुवारी ते मार्च असा आहे. मोसंबीमध्ये मृग बहार धरण्यासाठी त्याची क्रिया ही फेब्रुवारीमार्चपासून चालू होते. मार्च-एप्रिल, मे व जून या महिन्यात कडक उन्हाळा व प्रखर सूर्यप्रकाश असतो. साधारण फेब्रुवारी महिन्यात नवती फुटते व मार्च महिन्यात ती पकी होते. पण मार्च महिन्यापासूनच दिवसाचे उष्णतामान वाढायला सुरवात होऊन ते ३५ अंश सें. ग्रे. च्या वर जाते. साधारणपणे मृग बहाराची क्रिया सुरू होते तेव्हा म्हणजे मार्चमध्ये नवती पकी होते. ही नवती झाडातील साखर व प्रोटीन घेऊन वाढते. त्यामुळे फांद्यातील शक्ती कमी होते. ही नवती फुटून दिल्यास मृग बहार फोडण्यास थोडी निश्चितता येऊ शकते. फेब्रुवारी महिन्यातील नवती पकी होऊन नवतीची पाने अन्नद्रव्ये तयार करण्यास सुरुवात करेपर्यंत ३-४ आठवड्यांचा काळ जातो. ही नवती कार्यक्षम होईपर्यंत ,N मोठ्या प्रमाणावर फांद्यातील शक्ती घेते. जुनी पाने इं मात्र या महिन्यात पानांमध्ये साखर तयार करण्याचे कार्य सुरू ठेवतात. जुनी पाने नसतील तर काहीच अन्न तयार होत नाही. एप्रिल व मे महिन्यातील प्रखर उष्णतेमुळे दिवसा १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत साखर तयार होण्याची क्रिया थांबलेली असते. मात्र या काळात उष्णतेमुळे व प्रखर प्रकाशामुळे फांद्यामधील साखरेचे विघटन होण्याची क्रिया वेगाने सुरू असते. मात्र रोगामुळे पानांतील ही क्रिया मंदावते, तेव्हा वेळीच रोगाचा बंदोबस्त करावा. मे महिन्यात मोसंबीच्या बागेला ताण देतात. पाण्याच्या ताणामुळे पानांमध्ये अॅबसिसिक अॅसिड या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे फुले येण्याची क्रिया होते. फेब्रुवारी महिन्यातील नवतीवर मृगाच्या कळ्या धरत फेब्रुवारीतील नवतीमध्ये अनेक ऑक्झीन्स तयार होतात व ती फुले येण्याच्या क्रियेत बाधा आणतात. काही हार्मोन्सद्वारे नवती (डेरी) येणे तात्पुरती बंद करता येते. पाण्याचा ताण एप्रिलपासून सुरू करावा व तो हलका असावा. हळूहळू ताण वाढवावा. मुळाची वाढ रोखून धरण्यासाठी हलकी नांगरट करावी. पानामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता अजिबात राहू नये यासाठी मागील वर्षापासून झाड निरोगी व सशक्त करण्याचा प्रयत्न करावा. पाऊस पडण्यापूर्वी झाडांच्या वयोमानानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार २ ते ५ किलो सेंद्रिय खत (५ ते १० वर्षांच्या झाडांना) द्यावे. बहार कसा धरावा ? उष्ण आणि समशीतोष्ण हवामानात मोसंबीच्या झाडाची वाढ सतत फुलधारणा होण्यापूर्वी मोसंबीच्या झाडांना विश्रांतीची आवश्यकता असते. ही विश्रांती नैसर्गिकरीत्या मिळत नसल्याने कृत्रिमरीत्या बहार धरण्याची प्रक्रिया करावी लागते. आपल्याकडे हिवाळ्यात तापमान कमी होत फुटण्यासाठी बहार येतो. मोसंबीच्या झाडांना (ताण) दिला जात नाही. त्यांची वाढ अनियंत्रित ठेवली तर खालील दुष्परिणाम दिसून येतात. मोसंबीच्या झाडास वर्षभर सतत फुले येतात. एका बहाराची फुले झाडावर असताना दुस-या बहाराची फुले कमी लागतात. झाडावर येणा-या सततच्या फुला-फळामुळे झाडावर परिणाम होतो व झाड कमकुवत बनते. कोड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. मोसंबीच्या फळाची प्रत चांगली राहत नाही. राखण आणि इतर खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढतो. भारी पण उत्तम निच-याच्या जमिनीत, ताणाचा कालावधी पाऊसमानानुसार आणि वेगवेगळ्या हवामानात कमी-अधिक होऊ शकतो. पाणी देताना अथवा पाणी तोडताना पाणी टप्प्याटप्याने जास्त अथवा कमी करावे. पाणी सुरू करण्यापूर्वी आळे करून शिफारसीप्रमाणे खते द्यावीत. झाडाला ताण बसला हे कसे ओळखावे मोसंबीच्या झाडाला चांगली व जोमदार वाढ झाल्यावर आणि झाडांचा सांगाडा बनल्यावर झाडावर फळे घेण्यास सुरुवात करावी. लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षात झाडांची चांगली वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देऊन कमी प्रमाणात फळे घ्यावीत. ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत, बागेचे पाणी हळूह्ळू कमी करीत नंतर बंद करावे. ताण देण्याचा काळ हा जमिनीच्या प्रतीनुसार व झाडाच्या वयानुसार कमी-जास्त होऊ शकतो. ताण सुरू केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन फिकट व नंतर ती पिवळी पडतात. असे होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरुच ठेवतात. साधारणपणे पंचवीस टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे. पानांनी तयार केलेले कर्बयुक्त अन्न झाडाच्या फांद्यात साठते. या कर्बयुक्त अन्नपदार्थाचा उपयोग झाडांना नवीन पालवी झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि व्यापारीदृष्ट्या हे फायद्याचे ठरते. ताण जरुरीपेक्षा जास्त बसणार नाही, याची काळजी घ्यावी. भारी जमिनीत व ओल धरून ठेवणा-या जमिनीत बागेस एक हलकी नांगरट परिस्थिती पाहून ते करावे लागते. ताण कसा सोडावा आंबे बहारासाठी मोसंबीच्या बागेस ताण दिला असेल तर विहिरीचे हलक्या प्रमाणात पाणी देऊन ताण सोडावा. यावेळी भरखते, संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धे नत्र देऊन आंबवणी द्यावे. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी (चिंबवणी) द्यावे. तिस-या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यावर वीस ते पंचवीस दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्रांचा (निम्मा) हसा एक ते दीड महिन्यांनी द्यावा. हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. आंबे बहाराच्या मोसंबी बागेस पाणी देणे निसर्गावर अवलंबून नसल्याने हा खात्रीचा बहार ठरलेला आहे. मात्र मृग बहाराच्या बागेस ताण सोडण्याची प्रक्रिया पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने बरेच वेळा हा बहार खात्रीशीर ठरत नाही. मृग बहारासाठी मोसंबीच्या बागेस ताण सुरू केल्यानंतर झाडावर वाजवीपेक्षा जास्त ताण आला तर काही करता येत नाही. एकतर विहिरीला पाणी कमी असल्याने शेतकरी हा बहार घेतात आणि विहिरीला जरी पाणी असले तरी बागेस जास्त ताण बसल्यावर विहिरीचे पाणी देण्याची व्यवस्था केली तरी फायदा होत नाही. बाहेरचे तापमान खूप जास्त असल्याने पाणी देऊन बाग ताणाच्या धोक्यापासून वाचविली तरी आलेली फुले टिकत नाहीत. याशिवाय या बहारास वळवाच्या पावसामुळे धोका निर्माण होतो. मध्येच बागेची ताणाची स्थिती बिघडते आणि नुकसान होते. मोसंबी बागेला खते मोसंबी बागेला दीड ते दोन महिने पाण्याचा ताण बसल्यानंतर बागेतील जमीन भुसभुशीत करून घ्यावी. झाडाच्या आकारानुसार वाफे, आळे बांधून घ्यावेत. झाडांना पाणी देताना ते खोडाला लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याकरिता दुहेरीआळे (डबल रिंग) पद्धतीने रानबांधणी करावी. खते वर्षातून दोन वेळेस जून व जानेवारीमध्ये व बोरॉन व मोलाब्द या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज अधिक असते. झाडावर कमतरतेची लक्षणे प्रत्येक अन्नद्रव्याची वेगवेगळी दिसून येतात व त्यामुळे झाडाच्या वाढीवर फळधारणा, फळांची प्रत व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. ती झाडे डायबॅकला बळी पडतात. सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर माती परीक्षण करून केल्यास अतिउत्तम. त्यामुळे गरजेनुसार अन्नद्रव्ये जमिनीतून देता येतात किंवा फवारणी करता येते. त्याचप्रमाणे झाडाची पाने, खोड, फळे यावर प्रत्येक सूक्ष्म अन्नद्रव्याची विशिष्ट कमतरता पडू नये या दृष्टीने जून महिन्यात शेणखतातून सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताची दरवर्षी निर्धारीत मात्रा देणे चांगले. हंगाम कालावधी दोन पाण्यातील अंतर (दिवस) एकूण पाण्याच्या पाळ्या प्रत्येक पाळीत लागणारे पाणी एकर (इंच) एकूण पाणी एकर (इंच) उन्हाळा फेब्रुवारी १० १५ २ ३० पावसाळा जुलै-सप्टेंबर ५ १.५ ७.५ हिवाळा ऑक्टोंबर -जानेवारी १५ ८ २ १६ एकूण पाऊस खंडित झालेल्या गरजेप्रमाणे २८ ५३.५ मृगबहार अनिश्चित येण्याची कारणे मृग बहार फुटण्यापूर्वी साखर तयार होण्यास मिळणारा काळ (फेब्रुवारी व मार्चचा पहिला पंधरवडा) हा कमी पडतो. फेब्रुवारी महिन्यातील नवती व मुळांची वाढ झाडांची शक्ती घेते व त्यामुळे पुढील फुटीकरिता ऊर्जेचा साठा अपुरा पडतो. याचवेळी अति उष्णतेमुळे साखरेचे सतत विघटन होत राहते. ३) फेब्रुवारी महिन्यात आंबीया बहार फुटला तर झाडातील शक्ती व फुलांचे हार्मोन्स कमी होतात. त्यामुळे मृग बहार फुटण्यात समस्या येते. मागील वर्षांच्या मृगाची मोसंबी (फळे) झाडावर मोठ्या संख्येत असली किंवा बराच काळ झाडावर ठेवली तरी नवीन भार फुटण्यास बाधा निर्माण होते. पाण्याच्या जास्त ताणामुळे झाडाच्या निरनिराळ्या जैविक क्रियांवर विपरीत परिणाम होतो व मोठ्या प्रमाणात कोवळ्या फांद्या सुकतात. मुळे रोगट असली तरी पाणी देऊनही फांद्या पाण्याअभावी सुकतात. पानांवर रोगांचा किंवा कोळशीचा प्रादुर्भाव झाल्यास साखर तयार होण्याची क्रिया मंदावते तर विघटन होण्याची क्रिया वाढते. उष्णतेमुळे व पाण्याच्या ताणामुळे पानांच्या श्वासोच्छवासात वाढ होते. त्यामुळे साखर तयार होण्याच्या गतीपेक्षा त्याचे विघटन होण्याची क्रिया जास्त वेगाने होते. परिणामी साखरेचा साठा कमी-कमी होतो. प्रखर सूर्यप्रकाशामुळे व उष्ण वा-यामुळे झाडाच्या श्वासोच्छवासाची क्रिया झपाट्याने वाढते व त्या प्रमाणात झाडातील साखरेचे विघटन होण्याची क्रिया वाढते. अति उष्णतेमुळे पानांमधील रंध (स्टोमाटा) बंद होतात. त्यामुळे साखर तयार होण्याची क्रिया अतिशय कमी होते. या सर्वावरुन असे लक्षात येते की, मृग बहार अनिश्चिततेची प्रमुख तीन कारणे आहेत. अ) आंबिया बहाराच्या नवतीमुळे व मुळांच्या फ्लशमुळे फेब्रुवारी महिन्यातच झाडातील शक्ती कमी होते.ब) जुनी पाने जी अन्न तयार करण्यासाठी महत्वाची असतात तीच रोगामुळे नष्ट होतात. क) उष्णतेमुळे साखरेची निर्मिती ऐवजी विघटनच जास्त होते. नायट्रोजनचे फूल लागण्यावर होणारे परिणाम नायट्रोजन (नत्र) चे प्रमाण जास्त झाल्यास झाडामध्ये पुढीलप्रमाणे अनेक क्रिया घडतात. मग त्या सर्व क्रियांचा एकत्रित परिणाम बहार येण्यावर होतो. नायट्रोजनमुळे पानांची/कांद्याची वाढ होते. त्यामुळे साखर तयार होण्याचे क्षेत्र वाढते. नायट्रोजनमुळे साखरेचे विघटन होण्याचे प्रमाण वाढते व साखरेचा साठा कमी होतो. नायट्रोजनमुळे झाडाचा श्वासोच्छवास होण्याची क्रिया वाढते. श्वासोच्छवास होण्याची क्रिया घडवून आणण्याकरिता लागणारी शक्ती ही साखरेचे विघटन होऊन मिळते. त्यामुळे साखरेच्या साठा कमी होतो. याकरिता बहार येण्यापूर्वी ३ ते ५ महिने नायट्रोजन (नत्र) देणे पूर्णपणे बंद करावे. याउलट जेव्हा फळे चालू असतात अथवा पुढील हंगामातील बहार धरण्यासाठी सध्य परिस्थितीत बहार नको असल्यास नायट्रोजनचे प्रमाण वाढविले जाते. पाण्याचा ताण व फुले लागण्याची क्रिया पाण्याचा मध्यम स्वरूपाचा ताण बसला की फुले लागण्याच्या क्रियेत मदत होते. त्याची कारणे खालीलप्रमाणे. पाण्याच्या ताणामुळे फांद्याची/पानांची व मुळांची वाढ थांबते, मुळांना विश्रांती मिळते. नायट्रोजनचे (नत्राचे) प्रमाण कमी होते. पानावरील रंध्र बंद होतात व साखर तयार करण्याचे प्रमाण कमी होते. अॅबसिसीक अॅसिडचे प्रमाण वाढते. जिबरेलीन्स कमी होतात व अनावश्यक वाढ थांबते. सायटोकायनीनचे प्रमाण कमी होते. पानांतील अन्नद्रव्य इतर भागात वाहून जाण्याची क्रिया मंदावते. पानांचा श्वासोच्छवास कमी होतो व साखरेचा साठा वाढतो. ज्या प्रमाणात पाण्याचा ताण बसेल त्या प्रमाणात फुले लागण्याचे प्रमाण वाढते. फुले लागण्याच्या प्रक्रियेकरिता आवश्यक असणा-या बाबी पूर्ण वाढ झालेली निरोगी पाने & 9 q R 3 फ्लोरीजेन कोवळ्या फांद्यांच्या टोकाकडे वाहून जाण्याची क्रिया फ्लोरीजेन तयार होण्यास योग्य परिस्थिती (थंडी/पाण्याचा ताण) हामॉन्समध्ये बदल-ओक्झीन जिबरेलेिन्स व सायटोकायनीनमध्ये घट तर ऑबसिसीक ऑसिडमध्ये वाढ़ ६) पानांचे फुलांमध्ये रुपांतर व कळ्या बनण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यानंतर कळ्या दिसू लागतात. मोसंबीतील फळगळ : समस्या मोसंबीला भरपूर फुले लागतात. फळधारणाही भरपूर होते. परंतु एकूण फुलांच्या ०.५ ते १ टक्क्याइतकीच फळे काढणीपर्यंत हाती लागतात. म्हणून फळगळ हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. फळधारणेपासून तर फळे काढणीपर्यंत वेगवेगळ्या कारणामुळे फळगळ होते. अंबिया पिकाची ९० टक्क्याहून अधिक फळगळ नैसर्गिकरीत्या होते. ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये होणारी फळगळ अधिक गंभीर स्वरुपाची कारणाव्यतिरिक्त देठाच्या इजेमुळे, रोगामुळे व फळमाशी आणि फळरस करणा-या पतंगामुळे अर्थी कची फळे पिवळी पडतात, सडतात व गळतात. परंतु फळगळ काही विशिष्ट काळात अतिशय तीव्र व जास्त प्रमाणात असते. मोसंबीमध्ये सुध्दा सुमारे १ ते २ लाखावरील फुलांपैकी फक्त ०.२ ते २ टक्के एवढीच फुले फळामध्ये रूपांतरित होतात. या मोठ्या प्रमाणावर होणा-या फुलगळीस इतर बरीचशी कारणे असली तरी वातावरणातील आर्द्रता, कोड व रोग यास कारणीभूत आहेत. फूलगळ खालीलप्रमाणे होते फळझाडावर फुलांची निर्मिती झाल्यानंतर ती उमलत असताना त्यांची गळ होत असते. दुसरी फूलगळ १५ ते २५ दिवसानंतर होते. यावेळी ज्या फुलाचे फळधारणेत रूपांतर झाले नाही, अशी फुले गळून पडतात. फळधारणा झालेली अति लहान फळे देखील गळून पडतात. ४) बोराच्या आकाराची व त्यापेक्षा मोठी झाल्यानंतर पक्र होईपर्यंत वाढ झालेल्या फळांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. वाढ झालेल्या फळात इथिलीन तयार होते व त्यामुळे फळगळ होत असते. फळगळीची कारणे : अनेक कारणामुळे फळगळ होत असते. त्यापैकी महत्वाची कारणे पुढीलप्रमाणे. झाडे रोगग्रस्त, किडग्रस्त, दुखापत झालेली अथवा अत्याधिक वयाचे असणे. झाडामध्ये ऑक्झीन व संजीवकाचे असंतुलन असणे. कर्ब : नत्र गुणोत्तराचे असंतुलन सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता व झाडाची उपासमार पाण्याचा ताण किंवा अतिरिक्त वापर तापमानातील चढ-उतार ओलिताचे व्यवस्थापन बरोबर नसणे, कमी किंवा अधिक पाण्यामुळे फळझाडास ताण बसतो. त्यामुळे फळ गळण्यास सुरुवात होते. बसत नाही. अंबिया बहाराची फळगळ रस शोषण करणा-या पतंगामुळे सुध्दा होते. या किडीचे प्रौढ पतंग सायंकाळी ७ ते ९ दरम्यानच्या काळात फळावर बसून आपली सोंड फळात खुपसतात आणि रस शोषण करतात. उपाययोजना रात्री पतंगाना प्रकाश सापळ्यावर आकर्षित करून मारावे. पतंगाला आकर्षित करून मारण्यासाठी आमिषांचा सुध्दा वापर करता येईल. त्यासाठी २ लिटर पाण्यात २०० ग्रॅम गूळ आणि २० मि.लि. मॅलॅथिऑन (०.१ टक्के) मिसळून आमिषाचे द्रावण तयार करावे. साधारणतः १ लि. द्रावण मोठे तोंड असलेल्या डब्यात टाकून ते झाडावर अधून-मधून टांगावेत. स्त्रोत- कृषी विभाग महाराष्ट्र शासन