केळी हे प्राचीन काळापासून परिचित असलेले फळपिक असून आपल्या संस्कृतीत केळी पिकाला शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. केळी हे जागतिक पातळीवर भात, गहू व मका या पिकानंतर चौथे महत्वाचे खाद्यपीक आहे. केळीची लागवड जगातील १३g पेक्षा अधिक विकसनशील देशांच्या उष्ण तसेच समशीतोष्ण भागात एकूण १0.१0 दशलक्ष हेक्टरवर केली जाते. तर त्यापासून १२१.८५ दशलक्ष टन केळी उत्पादन घेतले जाते (FAQ-2009) केळी पिकविणा-या देशांत भारत पहिल्या क्रमांकावर असून ४.९६ लाख हेक्टर क्षेत्रापासून ३४.0 टन प्रति हेक्टर उत्पादकता या प्रमाणे एकूण २७.५७ दशलक्ष टन केळी उत्पादित केली जाते. एकूण जागतिक उत्पादनाच्या २२.१५ टक्के उत्पादन एकट्या भारतातून होते. महाराष्ट्रात एकूण ८३,000 हेक्टर क्षेत्रापासून एकूण ४.८३ दशलक्ष टन केळीचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षांचा अपवाद वगळता, महाराष्ट्र राज्य मागील एक दशकापासून राष्ट्रीय स्तरावर केळीची सर्वाधिक ६२ टन प्रति हेक्टर उत्पादकता टिकवून आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारताचे केळीचे आगार म्हणून प्रसिद्धी पावलेल्या 'जळगाव' जिल्ह्यात केळी लागवडीखालील क्षेत्र ४४000 हेक्टर असून उत्पादकता ६५ टन प्रति हेक्टर आहे. जी महाराष्ट्र नव्हे तर भारतात सर्वाधिक आहे (NHB-2014) राष्ट्रीयस्तरावर केळी पिकावर संशोधनाची सुरुवात १८८२ साली कैळींच्या विंविंध्र स्थानेिक जाती तसेच रायवळ जातींच्या संकलनाने झाली. तथापि केळीवरील पद्धतशीर संशोधनाची सुरुवात 'अडूधराई' तमिळनाडू येथे झाली. केळी पिकामधील सुधारणेसाठी, संकरासाठी विविध वाणांची ओळख व संकलन करण्यात आले. केळी पिंकाचे व्यापारीदृष्ट्या वाढते महत्व लक्षात घेता, महाराष्ट्रात सर्व प्रथम सन १९४९ साली राज्य कृषेि विभागांतर्गत केळी संशोधन केंद्राची स्थापना कोपरगाव, जि. अहमदनगर येथे झाली. परंतु सन १९५0 मध्ये ते गणेशखिंड, पुणे येथे स्थलांतरित करण्यात आले. पूर्वीच्या बॉम्बे राज्यात विविध ठिकाणी केळी लागवडीखाली असलेल्या विभिन्न वाणांचा तसेच स्थानेिक जातींचे संकलन करून त्यावर अभ्यास सुरू करण्यात आला. केळी लागवडीच्या मूलभूत बाबींवर उदा. योग्य वाणांची निवड, लागवड हगाम तसेच कैळींच्या लागवडीसाठी विविध मशागतींच्या वेिश्री प्रमाणित करण्यावर भर देण्यात आला. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील केळींचे महत्व लक्षात घेता सन १९६१ मध्ये हे केळी संशोधन केंद्र जळगाव जिल्ह्यातील 'यावल या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. सन १९६०-७० च्या दशकात केळीची उत्पादकता अत्यल्प म्हणजे १५ - १८ टन प्रति हेक्टर होती. परंतु केळी पिकावर पडणा-या रोग आणि किडीचा प्रादुर्भाव सुध्दा अल्प होता हेही तेवढेच सत्य आहे. भारतातील विविध केळी पिकवणा-या राज्यात होणा-या केळी पैिकातील संशोधनामध्ये सुसुत्रीकरण आणण्याच्या दृष्टीने भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिली यांच्यामार्फत भारतातील विंविध ठिकाणी ११ केंद्रावर अखेिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पा अंतर्गत केळीवरील संशोधनाचे कार्य सुरू करण्यात आले. या अकरा समन्वयेित केंद्रांमध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत केळी संशोधन केंद्र 'यावल' चाही समावेश केला गेला. १९६०-७० च्या दशकात या समन्वयेित केळी संशोधन केंद्रात केळींसाठी स्थानिक परत्नें अन्नद्रव्य व्यवस्थापन, अधिकतम घन लागवड (HDP) पद्धत या बाबी विकसित करण्यावर भर देण्यात आला. अखेिल भारतीय समन्वयिंत संशोधन प्रकल्पा अंतर्गत ठरवण्यात आलेल्या उहिंटांमध्ये केळीच्या विंविंध्र वाणांचा संग्रह करून अभ्यास करणे, केळी लागवडीसाठी संपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणे, केळींसाठी लागणा-या अन्नद्रव्यांची मात्रा ठरविणे, केळी पिंकावरील रोग व किंडींचे व्यवस्थापन याचा समावेश करण्यात आला. प्रकल्प समन्वयक, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिली यांनी दिलेल्या उद्दिष्टांबरोबर महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कडून सुध्दा स्थानिक केळी उत्पादक शेतक-यांच्या गरजेनुसार केळी पिंकावरील संशोधनाची कामे सुरू करण्यात आली. केळी संशोधन केंद्र यावल येथून बसराई या बुटक्या वाणांची लागवडीची शिफारस ४ x ४ फूट अंतरावर लागवड करणे, कंद निवडीचे निकष, कंद प्रक्रिया, 100:४0:100 ग्रंम तें झाड़ नत्रस्फुरद व पालाश खतमात्रा देणें असे महत्वपूर्ण केळी लागवडीतील तंत्रज्ञान विकसित केले व केळी उत्पादक शेतक-यांच्या शेतावर ते यशस्वीरीत्या राबविंण्यात आले. स्वमालकीची जर्मींन नसल्याने व पाणीटंचाई या कारणामुळे हे संशोधन केंद्र पुन्हा जळगाव शहरात सन १९९१ साली स्थलांतरित करण्यात आले. दरम्यान केळीवरील मूलभूत संशोधनासाठी केंद्र शासनाने १९९३ साली तिरूचिरापल्ली, तमिळनाडू येथे राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राची स्थापना केली. संशोधनाचा मागेवा भारतात दोन प्रकारच्या केळीच्या प्रजातींची लागवड केली जाते. पहिल्या प्रकारच्या प्रजातींमध्ये केळींची भाजीसाठी लागवड केली जाते. यामध्ये ABB आणि AAB या अनुवांशिक गटात मोडणा-या जाती समाविष्ट आहेत. याला इंग्रजीमध्ये Plantain म्हणतात. अशा प्रकारच्या केळीची लागवड प्रामुख्याने दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यात केली जाते. दुस-या प्रकारच्या केळीच्या प्रजाती कॅवेंडिश (AAA) या अनुवांशिक गटातील असून याची फळे पिकवून खाण्यासाठी वापरली जातात. या प्रकारच्या केळीच्या प्रजातींची लागवड महाराष्ट्रासह उर्वरित भारतात केली जाते आणि या गटाखालील लागवड क्षेत्र पहिल्या गटाच्या केळी पेक्षा ३/४ अधिक आहे. PK कॅवेंडिश, जातीची केळी नैसर्गिकरीत्या तिहेरी (AAA) संकरीत आहे संकर (Hybridization) .N पद्धतीव्दारे जाती विकसित करणे ही खूप कठीण - झा तसेच दीर्घकालिन प्रक्रिया आहे. तथापि या दिशेने ही जागतिकस्तरावर तयार केलेली पहिली केळीची संकरित जात सन १९६२ साली ग्रोमिशल × पेिसींग लिलीन या जातींचा संकर करुन जमायिका येथे विकसित करण्यात आली. ही जात उंच उसल्याने वा-याच्या अधिक वेगाला बळी पडते म्हणून हिचा प्रसार झाला नाही. विरूपाक्षी या डोंगरी जातीला पर्याय म्हणून को.१ (Co-1) ही संकरित जात कोईमतूर, तमिळनाडू येथे विकसित करण्यात आली. तथापि लहान घडामुळे या संकरित जातीचा विस्तार झाला नाही. बी.आर.एस -१ (B.R.S.-1) ही संकरित जात केळी संशोधन केंद्र, कन्नारा, केरळ येथून विकसित झाली. ही जात करपा, सुत्रकृमी तसेच पनामा विल्ट या रोगांना प्रतिकारक्षम आहे. तथापि कमी वजनाच्या घडामुळे हिवासुद्धा विस्तार झाला नाही. आंतरराष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, हॉडूरास येथून केळीच्या त्यामध्ये फिया - o१, (FHIA-01) फिया - १८ (FHIA-18) व फिया - २३ (FHIA-23) यांचा समावेश आहे. या संकरित जाती काळा करपा रोगाला जरी प्रतिकारक्षम असल्या तरी या जातींच्या केळीची चव आकर्षक नसल्याने या संकरित जातींचा विस्तार झाला नाही. राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिचरापल्ली येथे लागवडीपासून काढणीपर्यंत तसेच काढणीपश्चात बाबींवर संशोधन होऊन संशोधनपर शिफारशी देण्यात आलेल्या आहेत. तथापि या सर्व शिफारशीपर तंत्रज्ञान केळीच्या दक्षिणेतील AAB तसेच ABB या प्रजातींसाठी विकसित करण्यात आले आहे व हे तंत्रज्ञान महाराष्ट्रासह उर्वरित भारतात लागवडीखाली असलेल्या कॅवेंडिश गटातील केळीसाठी लागू पडत नाही. राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र, त्रिची येथे निवड पद्धतीने विकसित करण्यात आलेली ‘उद्यम' ही सुधारित जात ABB गटात मोडणारी आहे. ही जात उंच असून पीक कालावधी १४ महिन्यांचा आहे. या जातीची वाढ आपल्या हवामानात फारसी समाधानकारक आढळून आली नाही. याशिवाय या केंद्राने शिफारस केलेली प्राथमिक अन्नद्रव्याची मात्रा आपल्या जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांच्या मात्रेशी सुसंगत नाही. तथापि केळीवरील सामान्य रोग आणि कोड नियंत्रणासाठीचे संशोधन इतर भागांसाठी उपयुक्त ठरलेले आहे. सन १९८०-९० च्या दशकात केळी शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडले. या दशकात केळीची लागवड टिश्यूकल्चर रोपांपासून ठिबक आणि काळानुरूप केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे 'ग्रॅडनैन' या मध्यम उंच जातीच्या लागवडीची शिफारस करुन या जातीच्या पिकाच्या वाढीच्या गरजांनुसार तसेच खानदेशच्या या हवामानानुसार १.५ × १.५ मीटर लागवड अंतर, जमिनीतून द्यावयाची अन्नद्रव्याची मात्रा २उ ४0-२00 ग्रॅम /झाड नत्र, स्फुरद, पालाश व या मात्रेचा ७५ टक्के म्हणजेच १५0 - १५0 नत्र व पालाश ग्रेम / झाड ठिबक द्वारा (फर्टीगेशन) '. पीक वाढीच्या अवस्थेनुसार ४४ हप्त्यामध्ये खते | पाणी देण्याच्या मात्रेचे वेळापत्रक व शिफारस असे महत्वपूर्ण संशोधनपर तंत्रज्ञान या संशोधन केंद्राने विकसित केले. याशिवाय घड व्यवस्थापनातील केळी वरील पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट (o:५२:३४) अधिक युरिया मिश्रणाची निसवण झाल्यानंतर घडावरील फवारणी केळीच्या अधिक दर्जेदार उत्पादनासाठी मैलाचा दगड (Milestone) ठरली आहे. ऊतीसर्वधित केळी लागवड ही कंद लागवडीपेक्षा खर्चीक असली तरी अनेक प्रविण्यासह लवकर तयार होत असल्याने पिलबाग घेणे (Ratoon) अनिवार्य ठरते. यासाठी जळगाव संशोधन केंद्राने पिलबागेसाठी पिल केव्हा सोडावा जेणेकरून पहिल्या पिकावर विपरीत परिणाम न होता पिलबागेपासून अधिक उत्पादन कसे घेता येईल याबाबत महत्वपूर्ण शिफारस दिली आहे. पुढे या पिलबागेचे पोषण कसे करावे, याबाबतचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. नव्वदच्या दशकात आपल्या महाराष्ट्रात केळीवरील 'करपा’ रोगाने थैमान घातले होते. या पिवळया करप्याला कारणीभूत असलेली नेमकी 'बुरशी' (Mycospharella musicola) तसेच या रोगाची झपाट्याने पसरण्याची नेमकी कारणे या संशोधन केंद्राने विस्तृत केली. करपा रोगाच्या दोन महत्वाच्या शिफारशी दिल्या. पहिल्या शिफारशीत बुरशीनाशकात कंद प्रक्रिया तसेच 'काबॅन्डॅझिम' या बुरशीनाशकाची फवारणी तर दुस-या शिफारशीत 'प्रोपिकोनाझोल’ बुरशीनाशकाची खनिज तेलामध्ये मिसळून फवारणीचा समावेश आहे. करपा या बुरशीजन्य रोगाचा प्रसार पावसाच्या पाण्याने तसेच वा-यामार्फत झपाट्याने वाढतो. या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी मागील चार वर्षापासून कृषि विभागाअंतर्गत (Horisap) योजनेमार्फत बुरशीनाशकाशिवाय इतर मशागतीच्या विधींचा समावेश करून एकात्मिक पॅकेज तयार करण्यात येऊन कर्मचारी प्रशिक्षण तसेच शेतकरी मेळाव्यांद्वारे यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. याशिवाय इर्वेिनियारॉट व काढणीपश्चात रोगावर सुध्दा संशोधन करून निदान सुचविण्यात आले आहेत. पूर्वीच्या काळात महाराष्ट्रात पिकविल्या जाणा-या केळीच्या जातींमध्ये होता. ८०-९० च्या दशकात बसराई मधून निवड पद्धतीने विकसित अधिक उत्पादन देण्याची 'श्रीमंती' तर 'रोबस्टा' मधून 'महालक्ष्मी’ व 'आंबेमोहर'या जातींची लागवड खानदेशात आजही मोठ्या प्रमाणात केली जाते. नव्वदच्या दशकात दक्षिण अमेरिकास्थित बहुउद्देशीय केळी व्यापारी कंपनी 'डोले (Dole)' विकसित 'ग्रँडनैन' जातीच्या टिश्यूकल्चर रोपांमुळे वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यामध्ये नव्याने केळीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. केळी : भविष्यातील वाटचाल बदलत्या हवामानाचा (Climate change) परिणाम इतर पिकांप्रमाणे केळीवरही दिसू लागला आहे परंतु हा परिणाम मिश्र स्वरूपाचा आहे. वाढत्या तापमानामुळे तसेच सोसाट्याच्या वा-यामुळे झाडे उन्मळून पडणे, घड अडकणे, घड लवकर निसवणे, घडामधील फण्यांच्या तसेच फण्यांमधील केळीच्या संख्येत वाढ झाल्याचे प्रकार दिसू लागले आहेत. रोगांमध्ये इर्वेिनिया रॉट (Erwinia rot) पोंगासड (CMV) या रोगांचा प्रादुर्भाव तसेच तीव्रतेत वाढ झाल्याचे दिसते. किडींमध्ये खोडकिडा, स्पॉटेड बग (Spotted bug) व फळमाशी यांच्या प्रादुर्भावात वाढ होत आहे. मजुरी खर्च व मजुरांचा तुटवडा यामुळे केळी उत्पादन खर्चात वाढ होत आहे. सतत कोसळत्या बाजारभावाला पर्याय म्हणून केळीवरील मूल्यवर्धित तंत्रज्ञानाची तसेच प्रक्रिया तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. केळी उत्पादनातील ही आव्हाने पेलण्यासाठी केळी संशोधन केंद्र,जळगाव येथे अल्प, मध्यम तसेच दीर्घकालीन नियोजित संशोधन चाचण्यांची आखणी संशोधन संचालकांच्या मार्गदर्शनाखाली वर्ष २0२४ पर्यंत करण्यात आलेली आहे. केळी संशोधन केंद्र, जळगाव येथे ज्या संशोधन चाचण्या शिफारशीसाठी अंतिम टप्प्यात आहे त्यामध्ये केळी मध्ये चंदेरी /काळा प्लॅस्टिक कागदाचे हवामानात जून / ऑक्टोबर शिवाय इतर नेमक्या, महिन्यात लागवडीची केळीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर यांचा समावेश आहे. अधिक उत्पादन सोसाट्याच्या वा-यांना, जमिनीत कमी ओलाव्याला ही जात बळी पडते आणि झाडे उन्मळून पडतात. याशिवाय घड धारणेच्या अवस्थेत या जातीची झाडे कंबरेतून मोडतात. या जातीला पर्याय म्हणून या संशोधन केंद्राने सर्वेक्षणातून निवड पद्धतीने बुटक्या व कमी कालावधीत अधिक दर्जेदार उत्पादन देणारा तसेच सोसाट्याच्या वा-याला, अधिक तापमान व करपा रोगाला सहनशील क्लोन (Clone) ची निवड केली असून हे नवीन सुधारित 'वाण' म्हणून प्रसारित करण्याच्या दृष्टीने अंतिम टप्प्यात आहे. केळी उत्पादनातील खर्च कमी करण्याच्या दृष्टीने केळी आंतरमशागतीतील विविध कामांमध्ये यांत्रिकीकरणासाठी उदा. घडांना आधार, घडांना स्कटॉँग बॅगचे आवरण घालणे, घड कापणी, घड कापणीनंतर उभ्या खांबांना कापणे आणि त्याचा लगदा करणे, जमिनीखालील कंद बाहेर काढणे (Cump remover) या बाबीवर कृषि अभियांत्रिकी शाखेतर्गत संशोधन आखण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात केळी पिकावर संशोधन करणारे एकमेव केळी संशोधन केंद्र, जळगावने आजतागायत केळी उत्पादक शेतक-यांना अनेक संशोधनपर महत्वाच्या शिफारशी देऊन एकूण विक्रमी केळी उत्पादनात मोलाचा वाटा उचललेला आहे. केळी संशोधन केंद्र, जळगावचे बळकटीकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. संशोधनासाठी मूलभूत सोयीने सज असलेले हे संशोधन केंद्र पुढेही केळी उत्पादनातील समस्या सोडविण्यासाठी इतर तत्सम संस्थांबरोबर सक्षम राहील. स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन