1) ट्रायकोग्रामा: ट्रायकोग्रामाची माशी अति सूक्ष्म असते. ती दुसऱ्या किडीच्या अंड्यात आपली अंडी घालते, त्यामुळे अंडी अवस्थेतच किडींचा नायनाट होतो. अशी ट्रायकोग्रामाची अंडी असलेली ट्रायकोकार्ड आपणाला विकत मिळू शकतात. एका कार्डावर 40 हजार अंडी असतात आणि हे एक कार्ड 1 एकरासाठी पुरेशे होते. या कार्डच्या विशिष्ट आकाराच्या 20 पट्ट्या कपाशीच्या पानांच्या खालच्या बाजूने राहील आणि त्या सारख्या अंतरावर लावल्या जातील. कपाशीच्या शेतात बोंडअळ्याची अंडी दिसू लागल्यावर किंवा उगवणीनंतर 40 ते 45 दिवसांनी या पट्ट्या लावाव्यात. या पट्ट्यावरील अंड्यांमधून 7 ते 9 दिवसांत ट्रायकोग्रामाचा प्रौढ बाहेर पडून बोंडअळ्याच्या अंड्यांचा शोध घेतो व त्यामध्ये आपली अंडी घालतो. अशा तऱ्हेने अंडी अवस्थेतच किडींचा नायनाट होतो. ट्रायकोग्रामा तिन्ही प्रकारच्या बोंडअळ्यासाठी उपयोगी आहे. किडीच्या जीवनक्रमाच्या संख्येत घट करते. रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत कमी खर्च येतो. या कीड नियंत्रक शत्रूचे उत्पादन करण्याची साधी, सोपी पद्धत आहे. 2) एपेंटेलीस: या मित्र किटकाची मादी बोंडअळीच्या शरीरामध्ये अंडे घालते व नंतर या अंड्यातून निघालेली एपेंटेलीसची अळी बोंडअळीवर उपजीविका करून काही दिवसात बोंडअळीच्या शरीरातून बाहेर पडते व आपले कोष तयार करते व परिणामी बोंडअळी मरते. 3) प्रोम्यूसिडी, अनॅसियस व अनॅगॅरस: या तिन्ही परोपजीवी किडी कपाशीवरील पिठ्या ढेकणाच्या शरीरामध्ये अंडी घालतात व त्यांची वाढ तेथूनच पूर्ण होते. यामुळे पिठ्या ढेकुण मरतात व ते तपकिरी रंगाचे होतात. या किडीमुळे नैसर्गिकरीत्या पिठ्या ढेकणाचे मोठ्या प्रमाणात नियंत्रण झाले आहे