नारळ बागेत किडींबरोबरच रोगांचाही प्रादुर्भाव होत असतो त्यासंबंधीची कारणे, लक्षणे आणि उपाययोजना याबाबत सविस्त माहिती येथे देण्यात येत आहे. कोंब कुजव्या कोंब कुजणे हा रोग लहान रोपांना झाला असेल तर लहान रोपांचे नुकतेच उमलत असलेले पान मलूल दिसते. असे पान बाहेरून हलक्य हाताने दुमडून पाहिल्यास पान नरम पडलेले दिसले तर रोगास सुरुवात् पान हलक्या हाताने ओढून पाहिल्यास ते उपसून येते. या पानाच्या देठाल घाणेरडा वास येतो. नारळाचे रोप खडुष्यात लावताना त्या रोपाचा फक्त नारळच जमिनीत् पुरावयाचा असतो. नारळाबरोबर रोपाचे खोड जमिनीत पुरावयाचे नसते म्हणजेच नारळाचे रोप खोलवर लावायचे नसते. जर नारळाबरोबर रोपाचे खोड जमिनीत पुरले गेले असेल तर हा रोग होण्याची दाट शक्यता असते या रोपाच्या नारळाबरोबर खोडाचा काही भाग जमिनीत पुरला गेला असेल अशा रोपाच्या कोंबात पाण्याबरोबर मातीचे सूक्ष्म कण पानाच्या बगलेतू जातात. या मातीच्या कणांबरोबर बुरशीचे कण देखील असतात. वा-याने जातात. त्यामुळे कोंबाला जखमा होतात. या जखमांमधून बुरशीचे कण् आत जातात आणि कुजण्याची क्रिया सुरू होते. मोठ्या माडास हा रोग झालेला असल्यास नुकतेच उमलून आलेले पान कोमेजते व लूळे पडते. वान्याची जराशी झुळूक जरी आली तरी ते वेडेवाकडे हलत राहते. रोग जास्तच झाला असेल तर हे पान मोडून पडते. रोग सभोवती असलेल्या पानाच्या देठावर पोहोचल्यास ही पाने देखील कोमेजतात व निस्तेज दिसतात. मोठ्या माडांना हा रोग पावसाळ्यात होण्याची दाट शक्यता असते. पावसाळ्यात जेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो, त्यावेळी माडाच्या सुईचा वरचा भाग वा-याबरोबर हलत असतो. तसाच सुईचा खालील भाग तितकासा हलत नसतो. परंतु या दोन भागांमधील भाग अशावेळी ब-याचदा तडकतो. या आत जाते. फायटोप्थोरा ही बुरशी नारळाच्या या भागात सुमावस्थेत असते. पावसाळ्यात योग्य वातावरण निर्माण होताच तिचा प्रसार या तडकलेल्या भागात होऊन ती वाढाण्यास सुरुवात होते व कुजण्याची क्रिया सुरू होऊन हळूह्ळू कुजण्याची क्रिया कोंबापर्यत जाऊन कोंब कुजतो. उपाययोजना नारळाचे नवीन रोप लावताना फक्त नारळच जमिनीत पुरावा. रोप लावून झाल्यावर रोपाच्या नारळाभोवतीची माती पायाच्या टाचेने घट्ट दाबावी. वा-यामुळे रोप हलू नये, म्हणून रोपाच्या उंचीच्या दोन काठ्या पुराव्यात आणि तिसरी काठी रोपाच्या पूर्वेस दोन्ही काठ्यांवर आडवी बांधावी. या आडव्या काठीला रोप सैलसर बांधावे. असे केल्याने रोपांना काठीचा व्यवस्थित आधार मिळतो. नवीन लावलेल्या रोपाच्या भोवती जर पावसाचे पाणी साचून राहत असेल तर त्या पाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने व्यवस्था करावी. यासाठी पाणी काढण्यासाठी छोटे चार योग्य त्या दिशेने काढावेत. रोग लागलेली झाडे उपटून नष्ट करावीत. बागेतील इतर रोपांवर एक टका बोडॉमिश्रणाची फवारणी करावी. बागेभोवती सुरूसारखी वारा अडविणारी झाडे लावावीत. अ) आपल्या बागेच्या सभोवती विशेष करून बागेच्या पश्चिमेस सुरुवातीपासूनच सुरूसारखी वारा अडविणारी झाडे लावावीत. ब) संततधार पावसाच्या काळात हा रोग संभवतो. सुई नरम पडली आहे, असे वाटल्यास उघडीप पडल्यावर शिडीच्या साहाय्याने माडावर चढून तो माड तपासावा. घाणेरडा वासे येत असेल तर कोंब कुजला असे समजावे. कोंबाचा कुजलेला भाग काढून टाकावा. जरूर पडल्यास सभोवतीची पाने देठातून कापावीत. कुजलेला संपूर्ण भाग काढून झाल्यावर त्यामध्ये एक टका बोडॉमिश्रण ओतावे. या बरोबरश्च प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक टका बोडॉमिश्रणाची फवारणी कोंबाजवळच्या गाभ्यावर पावसाळ्यापूर्वी करावी. क) उघडीप मिळाल्याबरोबर / रोग्ट मांडाराभोवती असलेल्या माडावर बोडॉमिश्रणाची फवारणी करावी, म्हणजे रोगाचा प्रसार होणार नाही. पानावरील करपा करपा या रोगामुळे माडाची पाने करपतात. हा रोग पेस्टॉलोशिया पार्लमेव्होरा नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव भारतातील सर्वच नारळ पिकविणा-या प्रांतात आढळून येतो. हा रोग उत्पादनाच्या दृष्टीने विशेष नुकसानकारक नाही. रोगाची तीव्रता ही दुर्लक्षित बागांमध्ये योग्य प्रमाणात खते इत्यादी न दिल्यास जास्त प्रमाणात आढळते. रोगग्रस्त नारळाच्या पानांवर पिवळसर तपकिरी रंगाचे असंख्य ठिपके पडून पाने पिवळसर दिसतात. ठिपक्यांचा मध्य भाग कालांतराने करड्या असंख्य ठिपके तयार होऊन ते एकत्र मिसळतात आणि त्यांचे रुपांतर मोठ्या चटयांमध्ये होते. कालांतराने रोगग्रस्त पाने संपूर्णत: करपतात आणि सुकतात. यामुळे माडाच्या वाढीवर परिणाम होतो. दुर्लक्षित भागात खते मुख्यतः पालाश खते, पाणी इत्यादी व्यवस्थित न दिल्यास या रोगामुळे उत्पादनात घट येऊ शकते. या रोगाच्या नियंत्रणासाठी बागेस शेणखत, रासायनिक खते व पाणी यांच्या योग्य मात्रा द्याव्यात. पावसाळ्यापूर्वी रोगग्रस्त माडावरील करपलेल्या झावळ्या काढून नष्ट कराव्यात. तसेच निरोगी झावळ्यांवर पावसाळ्यापूर्वी एक टका तीव्रतेचे बोडॉमिश्रण अथवा o.३ टक्के मॅन्कोझेब यांची फवारणी करावी. नियमित सिंचन व अन्नद्रव्यांची शिफारस केलेल्या मात्रा दिल्यास रोगाची तीव्रता कमी होते. खोड पाझरणे रोगग्रस्त माडांच्या खोडांवरील भेगांवाटे काळसर तपकिरी रंगाचा चिकट द्राव ओघळतो. हा द्राव तेथेच वाळून डिंकासारखा काळा पडतो. असे छोटे छोटे पट्टे एकत्र येऊन मोठे पट्टे तयार होतात व रोगाचे प्रमाण वाढल्यास असे खोडाच्या तळाशी असलेले पट्टे खोडाच्या वरच्या भागात वाढत जातात. रोगाचे प्रमाण आणखी वाढल्यास पानांचा आकार लहान होतो, त्यामुळे गळ होऊन उत्पादनात घट होते. खोड शेंड्याकडे निमुळते होते व काही वर्षात झाड मरते. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त भाग खरडवून साफ करावा व त्यावर बोडॉपेस्ट लावून डांबराचा लेप किंवा ५ टक्के ट्रायडेमार्फचा लेप द्यावा व त्यावर पातळ डांबर लावावे. रोगग्रस्त खरडवून काढलेला भाग जाळून नष्ट करावा. शिफारशीनुसार सेंद्रिय व रासायनिक खते द्यावीत. पाण्याचे योग्य नियोजन करावे. तंजावर मर किंवा अळिंबी रोग तमिळनाडूतील तंजावर प्रांतात सन १९५२ व १९५५ मध्ये झालेल्या वादळानंतर हा रोग तेथे प्रथम आढळून आला म्हणून तंजावर विल्ट (मर) असे त्यास म्हटले जाते. हा गॅनोडर्मा ल्युरिंग्डम या बुरशीमुळे होतो. यामध्ये मुळे कुजतात, खालील पाने वाळतात व ती वर मोडून लोंबकळतात, फळधारणा कमी होते, बुध्याजवळ खोडातून काळसर पाणी पाझरते व काही दिवसांनी झाड मरते तसेच रोगाच्या पुढील अवस्थेत खोडावर भूछत्र वाढते. या रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेली सेंद्रिय व रासायनिक खतासोबत ५ किलो निमपेंड द्यावी व पाण्याचे योग्य नियोजन करावे. रोगग्रस्त झाडास भोवताली चर खणून त्याला वेगळे करावे. माडाच्या आळ्यात २५ लीटर पाण्यात ३० मि.ली. कॅलॅक्झीन औषध घेऊन ते द्रावण ओतावे. तसेच मुळाद्वारे १०० मि.ली. ५ टक्के कॅलॅक्झीन चार महिन्याच्या अंतराने तीन वेळा द्यावे. फळांची गळ काही वेळा फायटोप्थोरा या बुरशीमुळे फळगळ होते. यामध्ये सुरवातीस छोट्या नारळ फळांवर देठाजवळ रोगग्रस्त ठिपके दिसतात व त्यानंतर तो भाग कुजतो व फळगळ होते. सुरवातीला झाडांना फळ धरण्यासाठी मादी फुलांना नरफुलांतील पुंकेसर न मिळाल्याने फळांची नैसर्गिक गळ देखील होते. यासाठी 0.३ एलिएट (फॉसिटील एल ८० टके पाण्यात मिसळणारी पावडर ३ ग्रॅम प्रती १ लीटर पाण्यात) या बुरशीनाशकाचे द्रावण मुळावाटे द्यावे. एक टका बोडॉमिश्रण या बुरशीनाशकांची पहिली फवारणी पावसाच्या सुरवातीस व त्यानंतर ४० दिवसांच्या अंतराने दोन वेळा करावी. नारळावरील किडी व त्यांचे नियंत्रण महाराष्ट्रात नारळाची लागवड फार मोठ्या प्रमाणात होत असून किडीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट दिसून येत आहे. यातील काही किडी आपल्या करणे आवश्यक आहे. गेंडया भुगा हा भुगा काळ्या रंगाचा असून त्याच्या डोक्यावर गेंड्यासारखे शिंग असते. म्हणून याला गेंड्या भुगा असे म्हणतात. हा भुगा माडाच्या शेंड्यामध्ये नवीन येणारा कोंब खातो. ज्या झाडांना भुगा लागला आहे. त्यांच्या शेंड्याजवळ ताजी भोके पडलेली दिसतात व नवीन येणारी पाने त्रिकोणी आकारात कापलेली आढळतात. यामुळे झावळ्यांचा वापर शाकारण्यासाठी करता येत नाही. तसेच हा भुगा नवीन येणा-या पोयीचेही नुकसान करतो. छोट्या माडांना प्रादुर्भाव झाल्यास माड मरू शकतो. भुंग्याने पाडलेल्या भोकातून सोंड्या मुंग्याची मादी अंडी घालते. त्यामुळे अशा माडांना सोंड्या पाणी साचून बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. मुंग्याचा प्रादुर्भाव जून ते सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर आढळतो. नारळावरील गेंड्या भुंग्याच्या नियंत्रणासाठी एकात्मिक किड नियंत्रण तंत्रज्ञान बागेतील मेलेल्या माडांची खोडे, कुजलेला पालापाचोळा इत्यादी जाळून नष्ट करावा किंवा त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी कारण अशाच मुंग्याचा उपद्रव जास्त असताना म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये माडाच्या सुन्यास उपद्रव झाला असताना किंवा त्यातून ताजा भुसा बाहेर येताना दिसत असल्यास त्यामध्ये तारेचा हूक घालावा व मुंगे बाहेर काढावेत. नारळाच्या बागेत २ × २ × २ फूट आकाराचे एकूण १o खडे प्रती हेक्टरी खोदावेत. त्यामध्ये शेणखत भरून ठेवावे. अशा खड्ड्यांमधून सापडणा-या अळ्या दर दोन महिन्याने एकत्र करून माराव्यात किंवा खड्ड्यांवर कार्बारील 0.१ टक्केची फवारणी करावी. बागेमध्ये जर मेलेले माड, कुजलेला पालापाचोळा असेल तर त्यावर दर तीन महिन्यांच्या अंतराने कार्बारील ५० टक्के पाण्यात विरघळणारे o.१ टक्के या प्रमाणात फवारणी करावी. दर तीन महिन्यांनी माडाचे निरीक्षण करून कोंबाशेजारच्या पहिल्या दोन पानांच्या बेचक्यात मिथिल पॅरॅथिऑन २ टक्के पावडर ५० ग्रॅम अधिक तेवढीच वाळू यांचे मिश्रण टाकावे. किंवा २५ ग्रॅम फोरेट १o जी हे दाणेदार कीटकनाशक छोट्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन पिशवीचे तोंड बंद करावे. या प्लॅस्टिकच्या `` पिशवीस २ ते ३ छोटी भोके पाडावीत व सदर पिशवी माडाच्या वरून दुस-या पानास बांधावी. सोंडचा भुगा या किडीच्या अळया माडाच्या खोडातील किंवा कोंबातील मऊ भाग खातात व खोड किवा कोब आतून पोखरतात अळ्या खोडाच्या आत असल्याने बाहेरून प्रादुर्भाव झाल्याचे ओळखणे कठीण होते. जेथे प्रादुर्भाव झाला आहे अशा ठिकाणी भोके दिसतात व त्यातून तांबूस तपकिरी रंगाचा स्राव बाहेर येतो. तसेच खोडातून ताजा भुसा बाहेर आलेला असता कोंबाकडील पाने निस्तेज व पिवळी दिसतात. कालांतराने संपूर्ण कोंब खाला जातो व माड मरतो. हा भुगा तांबड्या रंगाचा असून नावाप्रमाणे त्याला सोंड असते. नियंत्रण प्रादुर्भाव झालेला माड वाचविण्यासाठी वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. यासाठी माडाच्या खोडातून ज्या ठिकाणापर्यंत डिंक येत असेल. त्याच्या १.५ फूट वर गिरमिष्टाच्या साहाय्याने १० सें.मी. खोल तिरपे भोक पाडावे व त्यामध्ये १o मि.ली. मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही + १o मि.ली. पाणी यांचे मिश्रण नरसाळयाच्या साहाय्याने ओतावे. माडाच्या कोंबामध्ये उपद्रव असेल तर २२ ग्रॅम ५० टक्के कार्बारिल १ लीटर पाण्यामध्ये मिसळून किंवा २ मि.ली. ३० टक्के डायमेथोएट १ लीटर पाण्यात मिसळून द्रावण कोंबात ओतावे. मुळावाटे औषध देण्यासाठी माडाचे पेन्सिलच्या जाडीचे तांबूस तपकिरी रंगाचे मूळ निवडून त्यास तिरपा काप द्यावा. मोनोक्रोटोफॉस १o मि.ली. + १o मि.ली. पाणी यांचे मिश्रण एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घेऊन सदर मूळ या पिशवीत ठेवावे व पिशवीचे वरील उपाययोजना करण्यापूर्वी माडावरील सर्व पक्व नारळ काढून घ्यावेत व उपाययोजनेनंतर ४५ दिवसापर्यंत नारळ किंवा शहाळी काढू नयेत. सोंड्या मुंग्यामुळे मेलेल्या माडांची ताबडतोब विल्हेवाट लावावी. सोंड्या भुगे आकर्षित करण्यासाठी फेरोल्युअर प्लस या गंधाचा वापर करावा. हा गंध ६ महिन्यानपर्यंत प्रभावी असतो. माडाच्या खोडला पायऱ्या करू नयेत. कारण अशा पायऱ्यांवर सोंड्या भुंग्याची मादी अंडी घालते. माडाच्या हिरव्या झावळ्या तोडू नयेत . अगदीच आवश्यक असेल तर त्या १२० से.मी. अंतरावर तोडाव्यात काळ्या डोक्याची अळी या या किडीचा उपद्रव ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जास्त दिसून येतो. अळ्या पानाच्या खालच्या बाजूस जाळी तयार करून त्यामध्ये राहतात व पानातील हरितद्रव्य खातात. उपद्रवग्रस्त पाने करपल्यासारखी दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव सर्वसाधारणतः जून पानांवर होतो. उपद्रव सर्व पानांवर झाल्यास सर्व माड वळल्यासारखा दिसतो. नारळावरील काळ्या डोक्याच्या अळीच्या एकात्मिक कीड नियंत्रणासाठीचे तंत्रज्ञान किडीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर खालची जास्त उपद्रवग्रस्त २ ते ३ पाने कापून जाळून टाकावीत. काळ्या डोक्याच्या अळीच्या जैविक कोड नियंत्रणासाठी गोनेिअोड्स नेफॅटिडीस या अळीवर वाढणा-या परोपजीवी किडी ३५oo प्रती हेक्टर या प्रमाणात बागेत सोडाव्यात. काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर गरजेनुसार कार्बारील 0.१ टक्के किंवा डायक्लोरोव्हास 0.0५ टक्के यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी झावळ्यांवर करावी. फवारणी पानांच्या खालच्या बाजूस होईल याची दक्षता घ्यावी. फवारणी केल्यानंतर १५ दिवसांनी परोपजीवी किडी बागेत सोडाव्यात. उंदीर उंदीर कोवळे नारळ पोखरतात व त्यातील कोवळे खोबरे खातात व पाणी पितात. कालांतराने सदर फळांची गळ होते. उंदरांचा उपद्रव नारळ रोपवाटिकेतही होतो. रोपवाटिकेतील रुजत घातलेल्या नारळाचा कोंब उंदीर खातात. त्यामुळे रोपांचे नुकसान होते. नियंत्रण उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी माडावरील वाळलेली सर्व पाने, पोयी व इतर भाग काढून टाकावेत व माड स्वच्छ राखावेत. जमिनीपासून २ मीटर उंचीवर ३० सें.मी. रुंदीचा गुळगुळीत पत्रा झिंक फॉस्फाईड घालून तयार केलेल्या आमिषाचा वापर एक महिन्याच्या अंतराने करावा. यासाठी ३६0 ग्रॅम गव्हाच्या जाड्या भरड्यामध्ये १o ग्रॅम झिंक फॉस्फाईड व २० मि.ली. खोबरेल तेल यांचे मिश्रण करावे व हे मिश्रण थोडे-थोडे माडाच्या बेचक्यात ठेवावे. उंदरांच्या नियंत्रणासाठी ब्रोमॅडिओलोन या रक्त गोठवणा-या उंदीरनाशकाचा वापरही करता येतो. याची वडी माडाच्या बेचक्यात ठेवावी नारळातील इरिओफाईड कोळी ही एक अतिसूक्ष्म कोड असून तिचा आकार 0.२५ मि.मी. इतका आहे. ही कोळी कोड भुरकट पांढ-या रंगाची असून गांडुळाच्या आकारासारखी आहे. या किडीच्या पुढील भागात पायाच्या दोन जोड्या असतात व तोंड सुईसारखे असते. ही कोड नारळ फळाच्या देठाखाली जे घट्ट आवरण असते, त्या खाली मोठ्या संख्येने राहते. ही कोड तिच्या टोकदार सुईसारख्या तोंडामुळे नारळ फळातील रस शोधून घेते. परिणामी देठाच्या खालच्या भागात पांढरे चट्टे वाढत जाऊन तसतसे अशा फळावर तपकिरी रंगाच्या उभ्या रेषा उमटू लागतात. या रेषा वाढत जाऊन हळूहळू फळाच्या बाहेरील आवरण तडकते. त्यामुळे फळाची वाढ व्यवस्थित होत नाही. पर्यायाने नारळ लहान राहून खोब-याचे उत्पादन कमी होते. तसेच लहान फळांची मोठ्या प्रमाणात गळ होते. काथ्याची प्रतही घटते व काथ्या काढणे कठीण होते. नियंत्रणाचे उपाय या किडीचा प्रसार वा-यामार्फत होत असल्याने सर्वप्रथम प्रादुर्भावग्रस्त फळे जाळून नष्ट करावीत. प्रादुर्भावग्रस्त फळांची एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी वाहतूक कस्त नये प्रादुर्भाव दिसून येताच अॅझाडीरॅक्टीन १ टक्के या निमयुक्त कीटकनाशकाची ४ मि.ली./ लीटर याप्रमाणात नारळ घडांवर पुढे दिल्याप्रमाणे वर्षातून तीनवेळा फवारणी करावी. कीटकनाशकांची फवारणी करताना ती शक्यतो फळांच्या देठाजवळच्या भागात व संपूर्ण फळांवर होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच अॅझाडीरॅक्टीन कीटकनाशक मुळांवाटे देऊनही या किडीचे प्रभावी नियंत्रण करता येते. रताळ्याच्या रंगाची मुळे साधारणपणे दीड ते दोन फूट खोलीवर आढळतात. अशा मुळांना तिरकस काप देऊन वरील पाणी मिश्रित औषध प्लॅस्टिक पिशवीत भरून मुळाचे तिरकस काप पिशवीत घालावेत. मुळाचे टोक द्रावणात बुडेल अशारितीने त्यावर वजन ठेवावे. यासाठी १० टक्के तीव्रतेचे अॅझाडीरॅक्टीन (१० मि.ली. निमॅझॉल व १० मि.ली. पाणी) यांचे मिश्रण वापरावे. वरील उपाययोजना करण्यापूर्वी झाडावरील सर्व तयार फळे काढून घ्यावीत व उपाययोजना केल्यानंतर किमान ४५ दिवस नारळ/ शहाळी काढू नयेत. अशाप्रकारे नारळावरील विविध किडी व रोगांचे वेळीच नियंत्रण करावे. स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन