अधिक उत्पादनासाठी रब्बी पिकातील आंतरपीक पद्धती आंतरपीक पध्दती म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त पिके एकाच जमिनीत एकाच वेळी योग्य अंतरावर जमिनीत पेरली अथवा लावली जातात, अशा पीक पध्दतीस आंतरपीक पध्दती म्हणतात. आंतरपीक पध्दतीमध्ये एक प्रमुख पीक असते तर दुसरे दुय्यम पीक असते. दोन्ही पिकांच्या वाढीमध्ये फरक असतो. आंतरपीक पध्दतीमध्ये प्रामुख्याने या वर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असून आंतरपीक पध्दतीची निवड करताना खालील बाबी लक्षात घेण्यात याव्यात. रब्बी हंगामातील नत्र स्थिरिकरण करणारे पिक उदा. हरभरा या पिकांचा समावेश आंतरपीक पध्दतीत करावा. बुरशीनाशकाची / जिवाणु संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करावा. तेलवर्गीय व कडधान्य पिकांचा पीक पध्दती व आंतरपिक पध्दतीमध्ये समावेश करावा सप्टेंबरमध्ये पडणा-या परतीच्या मान्सूनवर थोडाशा पावसावर येणारी रब्बी ज्वारी + करडई तसेच जवस + करडई, हरभरा + करडई, हरभरा + सुर्यफुल, हरभरा + मोहरी, सुर्यफुल + करडई ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर राहील. सप्टेबर व ऑक्टोबरमध्ये पडणा-या पावसाच्या आशेवर रब्बी हंगामातील योग्य ती आंतरपीक पध्दती निवडून व अन्नद्रव्याचे योग्य व्यवस्थापन केले तर पिकांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे दिसुन येईल. कडधान्य पिकांचे शेती आणि मानवी आहारात अनन्यसाधारण महत्व आहे. जमिनीचा कस सुधारणे व टिकवून ठेवण्यास कडधान्य पिकाचे मोठे योगदान आहे. विविध पीक पध्दतीत कडधान्य पिकांचा समावेश केल्याने जमिनीचा पोत सुधारतो. या पिकांच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबीयम जिवाणू हवेतील नत्र शेपून घेत असल्याने या पिकांची नत्राची गरज ब-याचशा प्रमाणात परस्पर भागविली जाते. शिवाय कडधान्य पिकानंतर घेण्यात येणा-या पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो. त्यामुळे आंतरपीक पध्दतीमध्ये कडधान्य पिकाचा समावेश करण्यात यावा. आंतरपीक पध्दतीचे फायदे साधन सामुग्रीचा वापर उत्पादनात वाढ होते जमिनीची सुपिकता वाढते सेंद्रिय कर्बाचे प्रमाणात वाढ होते सुक्ष्म जीवाणुच्या संख्येत वाढ होते पिकांची फेरपालट करणे मशागतीचा खर्च कमी होतो एक पीक नष्ट झाले तरी दुस-याचे उत्पन्न मिळते कीड, रोग यांच्यापासून बचाव करता येतो तणांचा प्रादुर्भाव कमी होतो . सर्वसाधारणपणे सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये पाऊसमान चांगले राहिल्यास जमिनीमध्ये ओलावा चांगल्या प्रकारे साठविला जातो आणि पर्यायाने रबी हंगामातील पिकांचे चांगले उत्पादन मिळते. आंतरपीक पध्दतीमध्ये चांगले आंतरमशागत व गरजेनुसार पीक संरक्षण तसेच मृद व जलसंधारण केल्यास नैसर्गिक घटकांचा जास्तीतजास्त फायदा होण्यासाठी आंतरपीक पध्दतीची शिफारस केलेली आहे. मराठवाड्यातील जमिनीच्या प्रकारानुसार व पर्जन्यमानानुसार हमखास जास्त उत्पादन व नफा देणा-या खालील आंतरपीक पध्दतीची शिफारस करण्यात आली आहे. अ.क्र. पिके पेरणीच्या ओळीचे प्रमाण जमिनीची निवड मुख्यपिक पेरणी अंतर (सेमी) 1 रब्बी ज्वारी +करडइ ६.३ ,४:2 मध्यम ते भारी ४५*१० 2 करडइ + हरभरा २:४,६:३,३:३ मध्यम ते भारी ४५*१० 3 हरभरा + सुर्यफुल ३:३ मध्यम ते भारी ४५*१० 4 जवस+हरभरा/करडइ ६:३,४:२ मध्यम ते भारी ४५*१० 5 गहू+हरभरा ३:१ मध्यम ते भारी २२.५ 6 गहू+मोहरी ६:३ मध्यम ते भारी २२.५ 7 पूर्वहंगामी उस+कांदा १:१ मध्यम ते भारी 8 पूर्वहंगामी ऊस+बटाटा १:१,२:१ मध्यम ते भारी 9 उस+ कोबी १:१ मध्यम ते भारी 10 उस+हरभरा १:२ मध्यम ते भारी रब्बी हंगामासाठी संकरीत व सुधारित वाण रब्बी हंगामातील पिके संकरित/सुधारित वाण रब्बी ज्वारी सीसीएच-१५आर,सिसिएच-१९आर,परभणी मोती, परभणी ज्योती ,पीके व्ही क्रांती. हरभरा बीडीएन -९-३,बीडीएन जी -७९७ ,फुले जी-५, विजय,विशाल,दिग्विजय,जँकी ९२१८ करडई पीबीएन एस -१२,पीबीएन एस-४०,नारी - ६, शारदा, डिएसएच - १२९ जवस एनएल-९७ ,एनएल -१४२,एनएल-१६२,पिकेव्ही-एनएल-२६० गहू मालविका,राज-४०८३,एच डी - ४५०२ ,एन आय ए डब्लू -३०१ (त्र्यंबक),गोदावरी,तपोवन,मालवाशक्ती रासायनिक खतांच्या शिफारस केलेल्या मात्रा अ.क्र. पिकांचे नाम रासायनिक खतांच्या शिफारस केलेल्या मात्रा १ बटाटे १२०:६०:४० अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश लावणीच्या वेळी व अर्धे नत्र ३० दिवसांनी द्यावे. २ हरभरा २५:५०:०० संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी देणे ३ जवस २५:५०:०० संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी देणे ४ मोहरी ५०:५०:०० संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी देणे ५ करडई २०:२०:० कोरड्वाहुसाठी संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी द्यावी बागायतीसाठी ६०:४०:०० पेरणीच्या वेळी ३० कि.नत्र व ४० कि.स्फुरद आणि ३० कि. नत्र एक महिन्यांनी द्यावे. ६ रब्बी ज्वारी कोरड्वाहुसाठी - ४०:२०:२० संपूर्ण मात्रा पेरताना आणि ४० किलो नत्र २१ ते ३० दिवसांनी द्यावे ७ भुईमुग २५:५०:० संपूर्ण मात्रा पेरणीच्या वेळी देणे ८ उस २५०:११५:११५ नत्र,स्फुरद,पालाश / हे (पूर्वहंगामी) १० टक्के नत्र, अर्धे स्फुरद व पालाश लावणीच्या वेळी देणे . ४० टक्के नत्र ६ ते ८ आठवड्यानी , १० टक्के नत्र १२ आठवड्यानी व ४० टक्के नत्र , अर्धे स्फुरद व पालाश १६ आठवड्यानी द्यावे . 9 सुर्यफुल ६०:४०:३० पैकी अर्धे नत्र व पूर्ण पालाश व स्फुरद पेरणीच्या वेळी तर ३० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे. १० गहू ५०:५०:५० किलो नत्र , स्फुरद व पालाश पेरतेवेळी व ५० किलो नत्र २१ दिवसांनी देणे. उशिरा पेरणीसाठी :४०:४०:४० किलो नत्र आंतरपीक पध्दतीमध्ये मुख्य पीक व दुय्यम पिके घेतली असता त्यामध्ये जेव्हा मुख्य पीक व आंतरपीक यांचे १:१, २:२, १:२ असे ओळीचे प्रमाण घेतले असताना मुख्य पिकाला रासायनिक खताची शिफारस केलेली मात्रा हीच आंतरपिकास पुर्णपणे लागू होते. त्यासाठी वेगळी खताची मात्रा देण्याची गरज नाही. परंतू जेव्हा ३:३, ६:३, २:४ प्रमाणात मुख्य व दुय्यम पिकाची पेरणी केली असते तेंव्हा ओळीच्या प्रमाणानुसार मुख्य पीक व दुय्यम पिकाला शिफारस केलेली रासायनिक खताची मात्रा प्रती हेक्टरी देण्यात यावी. अत्यल्प पावसावर येणारी रबी हंगामातील आंतरपीक पध्दती १) रबी ज्वारी + करडई : ही आंतरपीक पध्दती ज्या क्षेत्रावर रबी ज्वारी मोठया प्रमाणात घेण्यात येते अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. वातावरणातील उष्णतापमानाच्या तफावतीमध्ये ज्वारी अथवा करडई सलग पिकात येणारी घट आतरपीक पध्दतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते. या आंतरपीक पध्दतीची शिफारस ६:३ या ओळीच्या प्रमाणात करण्यात आली आहे. इतर शिफारशी ज्वारीच्या व करडईच्या सलग पीक पध्दती सारख्या शिफारस करण्यात आलेल्या आहेत. २) करडई + हरभरा : मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पध्दतीची शिफारस करण्यात आलेली आहे. या आंतरपीक पध्दती ६:३, ३:३ किंवा २:४ ओळींच्या प्रमाणात घेतल्यास जास्त फायदा होतो. ३) जवस + हरभरा : मध्यम ते भारी जमिनीमध्ये या आंतरपीक पध्दतीची शिफारस करण्यात आलेली आहे. ही आंतरपीक पध्दती ६:३ किंवा ३:३ ओळींच्या प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा होतो. रबी हंगामातील बागायती आंतरपीक पध्दती गहू + हरभरा ही आंतरपीक पध्दती बागायती शेतीसाठी शिफारस करण्यात येते. मध्यम ते भारी जमिनीमध्ये ६:३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदा होतो गहू + मोहरी मध्यम ते भारी जमिनीमध्ये बागायती क्षेत्रासाठी या आंतरपीक पध्दतीची शिफारस करण्यात येते. या आंतरपीक पध्दतीत ६ ओळी गहू व ३ ओळी मोहरीची शिफारस करण्यात येते. इतर लागवडीच्या शिफारशी गहू व मोहरीच्या सलग पीक पध्दतीसारख्या शिफारस करण्यात आल्या आहेत. पूर्वहंगामी ऊसात घ्यावयाची आंतरपीके पूर्वहंगामी ऊसाची लागवड ऑक्टोबर ते नोव्हेंबर या दरम्यान करतात. या ऊसामध्ये मुख्यत्वेकरुन रबी हंगामात घेतली जाणारी पिके उदा. बटाटा, कांदा, लसूण, पाणकोबी, फुलकोबी, इ. आंतरपिके घेतात. पट्टा अथवा जोडओळ पध्दतीत (७५ ते १५० सें.मी.) आंतरपिकांच्या २ ओळी घाव्यात. यासाठी ऊस लावगडीनंतर ६ ते ७ दिवसात पाणी देण्याच्या आधी आंतरपिकाची टोकण अथवा पूनर्लागण करावी. मात्र या पिकांच्या व्यवस्थापनाबाबत विशेष लक्ष द्यावे. पूर्वहंगामी ऊस + कांदा ऊसामध्ये कांद्याच्या रोपाची लागण सरीच्या दोन्ही बाजूस १० ते १५ सें.मी. अंतरावर दुस-या पाण्याच्या वेळी करावी. या पिकाला मुख्य पिकांच्या खतमात्रे व्यतिरिक्त हेक्टरी १oo किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. जमिनीची सुपिकता टिकवण्याच्या व वाढविण्याच्या दृष्टिकोणातून कांदा हे उत्तम पीक आहे. पूर्वहंगामी ऊस + बटाटा (अ) सलग लागवड पध्दत जमिनीच्या प्रकारानुसार ऊसाची लागवड ८० सें.मी., १oo सें.मी. व १२0 सें.मी. केली जाते. ऊसाची व बटाटयाची एका वेळी लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीवर प्रथम बटाटे १00 सें.मी. अंतरावर शेतामध्ये सरळ रेषेमध्ये १५ ते २0 सें.मी. अंतरावर ठेवावे व त्यानंतर दोन बटाट्याच्या ओळीमधून रिजर चालवावा. जेणेकरुन अंथरलेले बटाटे हे वरंब्याखाली आपोआप झाकले जातात. तसेच रिजर्मुळे ऊस लागवडीसाठी सा-या तयार होतात आणि या सा-यामध्ये ऊस लागवड करता येते. ऊसात बटाटे या आंतरपीक पध्दतीत सर्वसाधारणपणे बटाटा पिकांचे १५0 ते २00 किंवटल उत्पादन मिळते. ब) जोडओळ पट्टा पध्दत जोडओळ पट्टा पध्दतीने ऊसाचे उत्पादन चांगले येते. २.५ फुटावर सलग स-या पाडुन प्रत्येक दोन सन्यात ऊसाची लागण करुन तिसरी सरी मोकळी सोडल्यास दोन जोडओळीत ५ फुटांचा पट्टा तयार होतो. अशा पटयातच बटाटा, हरभरा किंवा कांदा यांची लागवड करावी . मावा हे कीटक हिरव्या रंगाचे असून ते पाने, फांद्या, फुले आणि शेंगांमधून रस शोषून घेतात. त्यामुळे पीक पिवळसर आणि रोगट दिसून माव्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामुळे उत्पादनात घट आढळून येते. या अवस्थेत पिकाचे कमीतकमी नुकसान होण्यासाठी पिकाची पेरणी लवकरात लवकर करणे किफायतशीर असते. त्याचप्रमाणे नत्र खताचा जादा वापर आणि पालशची कमतरता असल्यास प्रादुर्भाव वाढतो. तेव्हा खतांच्या मात्रा योग्य प्रमाणात द्याव्यात. माव्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायमेथोएट ३0 टक्के प्रवाही ५00 मि.ली. अगर फॉस्फॉमिडॉन ८५ टक्के प्रवाही १00 मि.ली. हे कीटकनाशक ५o0 लीटर पाण्यात मिसळून द्यावे. पाने पोखरणारी आळी : ही अळी पानाच्या आत शिरून आतील पेशी खातात. त्यामुळे नागमोडी पारदर्शक आकृत्या दिसतात. अळी आणि कोषावस्था त्यांनी पोखरलेल्या जागेत असते. अशी पाने गोळा करून ती नष्ट करावीत, त्यामुळे पुढील किडींची वाढ थांबते. प्रादुर्भाव जास्त असल्यास फॉस्फॉमिडॉन १५0 मि.ली. अगर ५00 मि.ली. डायमेथोएट अगर मोनोफोटोफॉस ३६ टक्के प्रवाही ७00 मि.ली. ५oo लीटर पाण्यात मिसळून एक हेक्टर क्षेत्रावर फवारणी करावी. रोग करपा मोहरी पिकाच्या पाने, खोड आणि शेंगा यावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. नंतर हे ठिपके करड्या रंगाचे आणि आकाराने मोठे होऊन सर्व झाडावर पसरतात. या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करूनही प्रादुर्भाव झालेला आढळल्यास पिकावर डायथेन झेड-७८ हे बुरशीनाशक हेक्टरी १५00 ग्रॅम या प्रमाणात ५00 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. भुरी : हा रोग झालेल्या पिकाच्या पानांच्या खालच्या बाजूस पांढरे चट्टे पडलेले आढळतात. तरी हा रोग दिसू लागताच ३00 मेश गंधक भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात धुरळावी किंवा पाण्यात विरघळणारे गंधक हेक्टरी २ लीटर प्रमाणात ५00 लीटर पाण्यात मिसळून फवारावे. जरुरी प्रमाणे १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात. पिकाची काढणी पेरणीनंतर ९० ते १oo दिवसात पीक तयार होते. या पिकाची काढणी ८o टक्के शेंगा आणि पाने पिवळी झाल्यावर करावी. या वेळी बियाण्यात ओलाव्याचे प्रमाण सुमारे ३० टक्के असते. काढणीस उशीर झाल्यास शेंगा फुटून नुकसान होण्याची शक्यता असते. तरी काढणी शक्यतो सकाळी करावी म्हणजे आद्रतेमुळे शेंगा फुटणार नाहीत. पिकाची कापणी जमिनीलगत करुन पेंढ्या ३ ते ४ दिवसांनी वाळल्यानंतर काठीच्या साहाय्याने/बैलांच्या साहाय्याने किंवा यंत्राने मळणी करावी. मळणीनंतर उफणणी करून बियाणे स्वच्छ करावे आणि वाळवून पोत्यात भरून साठवावे. साठविण्याकरिता बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण ८ टक्क्यांपेक्षा कमी असावे. अशा त-हेने शास्त्रोक्त पद्धतीने या पिकाची लागवड केल्यास यापासून हेक्टरी १२ ते १५ किंवटल उत्पादन मिळते. स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन