प्रस्तावना

रासायनिपक खतांच्या वापरामुंळे शेतींच्या उत्पादनात वाढ होते हे खरे परंतुं ही उत्पादन वाढ काही तात्पुरत्या स्वरूपाची असते किंवा काही मर्यादीत स्वरूपाची असते.

रासायनिक खतांचे दुष्परिणाम :

आपण उत्पादनवाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो. रासायनिक खताचां अधिक व सातत्याने वापर केल्यामुळे जमिनीचा पोत बिघडतो. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होते. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्यास पिकांना पाणीही मोठया प्रमाणावर दयावे लागते. साहजिच त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. परिणामी जमीनी खारवटतात.

रासायनिक खतांप्रमाणे किटकनाशकांच्या वापराचेदेखील अनिष्ट परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. किटकांचा नाश करणारी किटकनाशके अर्थातच विषारी असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे उपद्रवकारक किटक मरतात त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीवजंतूही बळी पडतात. खरे तर निसर्गाने स्वतःच अनेक गोष्टीचा समतोल साधण्याची व्यवस्था केलेली असते. निसर्गान ज्याप्रमाणे पिलांना उपद्रवकारक किटक असतात त्याचप्रमाणे या किटकांवर उपजीवीका करणारेही काही किटक पक्षी प्राणी असतात.

रासायनिक खतांच्या वापरातून जमिनीच्या पोतावर होणारा दुष्परिणाम टाळणे या खतांच्या पिकांच्या दर्जावर व पर्यायाने आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे किटकनाशके व तणनाशके यांचाही पिकांवर व पर्यायाने आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळणे या उददेशातून सेंद्रीय शेती ही संकल्पना पूढे आली व विकसित झाली.

सेंद्रिय शेतीची सुरवात

आज रासायनिपक खते किटकनाशके व तणनाशके इत्यादिंचा वापर कमी करून अन्नधान्याचा दर्जा व अन्न सुरक्षा पाठविणे आणि त्याचवेळी उत्पादन खर्चही करणे अशा दुहेरी दुष्टीकोनातून सेंद्रीय शेतीला उत्तेजन दिले जात आहे.

आपल्या राज्यात अगदी अलीकडील काळात सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यात सुरुवात झाली आहे.

राज्यात सेंद्रीय शेतीला उत्तेजन देणा-या दोन योजना राबविण्यात येत आहेत. त्यापैकी पहिली योजना 150 % राज्यपुरस्कृत असुन ती वसंतराव नाईक शेती स्वावलंबन अभियानातंर्गत राबविली जात आहे.

सेंद्रीय शेती संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यासाठी खालील बाबींवर भर देणे महत्वाचे ठरते.

सेंद्रीय पदार्थाचा वापर

जीवाणू संवर्धकाचा वापर

हिरवळीचा खतांचा वापर

एकात्मिक किड व्यवस्थापन

आच्छादनाचा योग्य वापर

पिकांच्या अवशेषंचा व अन्न प्रक्रियेतील टाकाऊ घटकांचा तसेच ओल्या कच-याचा कंपोस्ट करून त्याचा वापर

पिकांची फेरपालट व आंतरपीकपध्दतीचा उपयोग

माहितीदाता : महादेव बी जगताप