६८ व्या युनाईटेड नेशन जनरल असेंब्लीमध्ये 20१५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मृदावर्ष घोषित करण्यात आले. जमिनीच्या आरोग्याविषयी जनजागृती करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. कारण जमिनींची उत्पादनक्षमता वाढविणे, पर्यायाने अन्नधान्य सुरक्षा आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडून प्रत्येक शेतक-याला त्याच्याकडील जमिनीचे मृद परीक्षण करून जमीन आरोग्यपत्रिका तयार करण्यासाठी प्रत्येक राज्यात निधी उपलब्ध करून दिला जात असून त्याद्वारे योजना राबविण्यात येत आहे. जमिनीच्या आरोग्यानुसार सुधारणा करून पीक पद्धतींचा अवलंब केल्याने शाश्वत अन्नधान्याचे उत्पादन घेणे शक्य होणार आहे. जमिनीची सुपीकता जमिनीमधील उपलब्ध असलेल्या गरजेच्या सर्व अन्नद्रव्यांचा पिकांना पुरविण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपीकता म्हणतात. माती परिक्षणाव्दारे जमिनीची सुपीकता ओळखली जाते. महाराष्ट्रातील जिल्ह्यानिहाय सुपीकता निर्देशांक व सुपीकतास्तर तक्ता क्र. १ मध्ये दर्शविला आहे. एकंदरीतच राज्याचा सुपीकतास्तर नत्राच्या बाबतीत कमी ते मध्यम, स्फुरदामध्ये कमी ते अत्यंत कमी आणि पालाशमध्ये भरपूर ते अत्यंत भरपूर आहे. महाराष्ट्रातील सुपीकता निर्देशांकात सन १९८० ते २00५ या कालावधीत झालेला बदल पाहिला तर नत्र आणि स्फुरदाच्या बाबतीत तो कमी झालेला आहे. परंतु पालाशच्या बाबतीत सुपीकता निर्देशांकात किंचीत घट झालेली दिसून येते. अन्नद्रव्ये सुपीकता निर्देशांक सन १९८० सन २००५ नत्र १.५२ १.३५ स्फुरद १.१४ १.०३ पालाश २.५४ २.५२ उपलब्ध निर्देशांक जरी जास्त असले तरी पिकांना शिफारशींत खताच्या मात्रेच्या ५५ टक्के मात्रा कमी करून देणे आवश्यक असते. कारण संपूर्ण उपलब्ध पालाश पिकांना उपलब्ध होण्यासाठी जमिनींचा ओलावा, सेंद्रिय कर्ब, तापमान, सूक्ष्मजिवाणूची संख्या इ. गोष्टींची अनुकूलता असावी लागते. जिल्हा सुपीकता निर्देशांक सुपीकता स्तर नत्र स्फुरद पालाश नत्र स्फुरद पालाश पुणे ०.९४ ०.९४ २.७८ कमी कमी अत्यंत भरपूर अहमदनगर १.२१ ०.८६ २.७७ कमी कमी अत्यंत भरपूर सोलापूर ०.७४ ०.६५ २.९४ अत्यंत कमी अत्यंत कमी अत्यंत भरपूर कोल्हापूर २.१४ 1.5० २.१६ साधारण भरपूर साधारण कमी साधारण भरपूर सातारा १.४७ ०.८९ १.७५ मध्यम कमी मध्यम सांगली १.२२ १.१७ २.२७ कमी कमी भरपूर ठाणे २.०९ १.८१ २.०१ साधारण भरपूर साधारण भरपूर साधारण भरपूर रायगड १.३६ १.४६ १.५२ मध्यम मध्यम मध्यम रत्नागिरी ०.८० १.३५ २.६४ कमी मध्यम भरपूर सिंधुदुर्ग २.०५ १.३५ ०.९६ साधारण भरपूर कमी कमी औरंगाबाद १.०७ 1.०० २.८८ कमी कमी अत्यंत भरपूर जालना १.०६ १.०२ 3.०० कमी कमी अत्यंत भरपूर बीड १.४३ १.७७ २.८६ मध्यम साधारण भरपूर अत्यंत भरपूर लातूर १.२८ ०.७२ २.७१ मध्यम अत्यंत कमी भरपूर परभणी १.६६ १.३३ २.६८ मध्यम मध्यम भरपूर नांदेड १.४३ ०.९२ २.८४ मध्यम कमी अत्यंत भरपूर उस्मानाबाद १.४१ १.२६ २.५२ मध्यम मध्यम भरपूर नाशिक १.५३ ०.८१ २.०८ मध्यम कमी साधारण भरपूर धुळे १.९२ १.०४ २.२८ साधारण भरपूर कमी भरपूर जळगाव १.०४ ०.९६ २.९८ कमी कमी अत्यंत भरपूर अमरावती ०.६४ ०.७२ २.८४ अत्यंत कमी अत्यंत कमी अत्यंत भरपूर अकोला १.४३ ०.८९ २.७६ मध्यम कमी अत्यंत भरपूर बुलढाणा ०.७२ ०.९१ २.८४ अत्यंत कमी कमी अत्यंत भरपूर यवतमाळ १.०२ ०.९८ २.७६ कमी कमी अत्यंत भरपूर नागपूर १.६५ १.२३ २.८४ मध्यम कमी अत्यंत भरपूर भंडारा 1.2० 0.9० २.७९ कमी कमी अत्यंत भरपूर वर्धा 1.6० ०.६६ २.४८ मध्यम अत्यंत कमी भरपूर चंद्रपूर १.४८ ०.८२ २.४४ मध्यम कमी भरपूर गडचिरोली १.०७ ०.६१ २.८६ कमी अत्यंत कमी अत्यंत भरपूर एकूण राज्य १.३५ १.०३ २.५२ मध्यम कमी भरपूर तक्ता क्र. २ : महाराष्ट्र राज्यातील विभागवार अन्नद्रव्ये कमतरतेची आकडेवारी (टक्के) अ. क्र. विभाग जस्त लोह तांबे मंगल १ पुणे ४९.८२ २०.३६ ०.६६ २.११ २ कोल्हापूर २५.५६ ७.२३ ०.३१ ०.७० ३ कोकण ३५.२१ २.३१ ०.२७ ०.४३ ४ औरंगाबाद ६०.५९ ६.३७ ०.६२ ०.९८ ५ लातूर ५१.०४ ११.४१ ०.२७ ४.४९ ६ नाशिक ४०.२७ ४.४४ ०.१८ १.५० ७ अमरावती ३३.९६ ९.८२ ०.०७ ०.५८ ८ नागपूर ३३.०८ ४.३० ०.० २.२१ एकुण राज्य ४२.०५ ९.०४ ०.२८ २.२९ महाराष्ट्र राज्यात सगळ्यात जास्त जस्ताची कमतरता ४२.o५ टक्के दिसून येते. त्याखालोखाल लोह (९.०४ टक्के) या सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता दिसून येते. तसेच बोरॉनची सुध्दा जास्त विम्लधर्मीय चुनखडीयुक्त तसेच कोकणातील तांबड्या जमिनीत फार मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येते. सुपीकता निर्देशांक कमी होण्याची कारणे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत आहे. जमिनीतील सामु मध्यम ते जास्त विम्लतेकडे वाढत चालला आहे. सखोल पिक पद्धतींचा वापर असमतोल अन्नद्रव्यांचा वापर अमर्याद सिंचनाचा वापर . रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा. जमिनीचे बिघडत चाललेले भौतिक गुणधर्म आणि कमी होत चाललेली सूक्ष्मजिवाणुची संख्या. जमिनीच्या वाढत चाललेल्या अपधावाच्या प्रमाणामुळे एक इंच सुपिक थर पाण्याबरोबर अन्नद्रव्यांसह वाहून जातो. जमिनीचे आरोग्य जमिनीचे आरोग्य म्हणजे दीर्घकालीन वनस्पतींना अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन मातीचे जैविक, भौतिक व रासायनिक गुणधर्म चांगले असणे, की याद्वारे पर्यावरणातील हवा व पाणी यांचे संवर्धन होईल, याशिवाय अन्त्रधान्य सुरक्षा आणि मनुष्य प्राणिमात्रांचे आरोग्य सुधारले जाईल. जमिनीचे आरोग्य हे जमिनीच्या रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्मावर अवलंबून असते. रासायनिक गुणधर्मामध्ये सामू, क्षारता , सेंद्रिय कर्ब, चुनखडीचे प्रमाण, अन्नद्रव्यांचे प्रमाण इ. घटक मोजले जातात. जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे ६.५ ते ८.० पर्यंत असावा, क्षारता 0.१० ते 0.५o डेसीसायमन/ मीटर असावी. चुनखडीचे प्रमाण १० टक्केपेक्षा कमी असावे. जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणाचे वर्गीकरण तक्ता क्र. १ मध्ये दिले आहे. प्रत्येक पिकांसाठी कृषि विद्यापीठाने खतांच्या शिफारशी दिल्या आहेत. या खत शिफारसीमध्ये जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरुन तक्ता क्र. ३ नुसार शिफारस खतमात्रेत कमी, जास्त बदल करावा. तक्ता क्र. ३ : जमिनीतील अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरूनपिकांच्या शिफारस खतमात्रेत खालीलप्रमाणे बदल करावा जमिनीतील अन्नद्रव्यांचे वर्गीकरण उपलब्ध अन्नद्रव्ये (किलो/हेक्टर) शिफारस खत मात्रेतील बदल नत्र स्फुरद पालाश अत्यंत कमी १४० पेक्षा कमी ७ पेक्षा कमी १०० पेक्षा कमी शिफारशीत मात्रेपेक्षा ५० टक्के जास्त कमी १४१-२८० ८-१४ १०१-१५० शिफारशीत मात्रेपेक्षा २५ टक्के जास्त मध्यम २८१-४२० १५-२१ १५१-२०१ शिफारशीत मात्र थोडे जास्त ४२१-५६० २२-२८ २०१-२५० शिफारशीत मात्र जास्त ५६१-७०० २९-३५ २५१-३०० शिफारशीत मात्रेपेक्षा २५ टक्के जास्त अत्यंत जास्त ७०० पेक्षा जास्त ३५ पेक्षा जास्त ३०० पेक्षा जास्त शिफारशीत मात्रेपेक्षा ५० टक्के जास्त जमिनीचा दुसरा गुणधर्म म्हणजे भौतिक गुणधर्म यामध्ये जमिनीचा पोत, वाहकक्षमता, पाण्याची मुरण्याची क्षमता इ. घटक मोजले जातात. जमिनीत चिकण मातीचे प्रमाण जसजसे वाढत जाते तसेतसे जमिनी भारी चिकण पोताच्या समजल्या जातात. या जमिनीची जलधारण क्षमता, तसेच अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. या जमिनी जास्त उत्पादन देणा-या असतात. जमिनीमध्ये वाळू आणि रेतीचे प्रमाण जसजसे वाढते तसतसे त्याची सुपिकता व जलधारणक्षमता कमी होते, तर त्याप्रमाणात पाण्याचा निचरा वाढतो. अशा प्रकारे जमिनीच्या पोतानुसार चिकण भारी, चिकण पोयटा, वाळुमय चिकण, वाळुमय पोयटा, वाळुमय इ. प्रकारात जमिनीचे वर्गीकरण केले जाते. जमिनीतील लहान मोठे प्राथमिक मातीकण (वाळू, रेती, चिकणकण) स्वतंत्र अवस्थेत न राहता जमिनीत निरंतर सुरू असणा-या विविध नैसर्गिक क्रियेमुळे परस्पराशी जोडले जातात, त्यास जमिनीची संरचना म्हणतात. त्यामुळे मातीचे लहान लहान एकत्रित कण तयार होतात व या एकत्रित कणांमुळे जमिनीत केशाकर्षणासाठी नलिका तयार होतात व त्याद्वारे पाण्याचे जमिनीत वहन होते. रवाळ संरचना पीक उत्पादनाच्या दृष्टीने उत्तम ठरते. क्षारयुक्त व चोपण जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर व योग्यवेळी प्रकारानुसार भुसूधारकांच्या वापरामुळे संरचना सुधारण्यास मदत होत. जमिनीची घनता : जमिनीची घनता हा महत्वाचा गुणधर्म असून आभासी घनता (बल्क डेन्सीटी) व खरी घनता (पार्टीकल डेन्सीटी) असे दोन प्रकार आहेत. आभासी घनतामध्ये कणांबरोबर अंतर्गत पोकळीचा समावेश असतो, तर ख-या घनतेमध्ये जमिनीत असणा-या प्रत्यक्ष कणांची घनता असते. आभासी घनता १.१ ते १.५ ग्रॅम/घन सें.मी. पर्यंत सर्वसाधारण असते परंतु वाळुसर जमिनीची आभासी घनता १.४ ते १.८ ग्रॅम/घन सें.मी. पर्यंत असते. जमिनीच्या पृष्ठभागाखाली जमीन घट्ट किंवा तळी असेल तर आभासी घनता जमिनीतील पोकळी ही वरील दोन्ही घनतेवरुन काढतात. ही सर्वसाधारणपणे ३0 ते ६० टक्क्यांपर्यंत असते. तर चांगल्या पीक वाढीसाठी जमिनीतील पोकळी ५० टक्के असावी. होतो. जमिनीत असंख्य सूक्ष्मजिवांचे वास्तव्य असते. या सजीवांच्या जैवरासायनिक क्रियेमुळे जमिनीची सुपीकता सुधारण्यासाठी खूपच मदत जिवाणू, बुरशी, शेवाळ, अदिनीद, अॅक्टीनोमायसीटीन इ. चा अंतर्भाव होतो. एक ग्रॅम वजनाच्या मातीत सुमारे १० लक्ष ते १ कोटीहून अधिक सूक्ष्मजिवांची संख्या असते. खालच्या थरापेक्षा जमिनीच्या वरच्या थरात सूक्ष्मजिवांची खेळती हवा असणे, मशागत योग्यवेळी करणे, आवश्यक ओलावा इ. बाबी जैविक गुणधर्म सुधारण्यास पोषक ठरतात. पाणी अति झाल्यास जमिनीत रोगजंतूची वाढ होऊ शकते व त्यामुळे झाडांच्या मुळावर रायझोक्टोनिया, पिथियम, फायटोष्थोरा इत्यादी अपायकारक बुरशी वाढून पिकांचे उत्पादन कमालीचे घटते. क्षारपड जमिन : महाराष्ट्रात क्षारपड जमिनीचे क्षेत्र वाढत आहे. सध्या १.o५ लाख हेक्टर जमिनी क्षारपड असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा येथील कालवा व नदीकाठचे सिंचनक्षेत्र आणि विदर्भातील पूर्णा खो-यातील क्षेत्रात जमिनीचे आरोग्य बिघडले आहे. याला कारण अतिरिक्त पाण्याचा पिकांसाठी वापर आणि ऊस पिकाची वारंवार त्याच जमिनीत होणारी लागवड या गोष्ठी कारणीभूत आहेत. कोरडवाहू भागात पाणलोट क्षेत्रामध्ये सुध्दा क्षारपड जमिनीचे क्षेत्र खोलगट भागात आढळून येते. कमी पाऊस, उष्ण कोरडे हवामान आणि मूळ खडकात असलेल्या अल्बाईट या खनिजातून वाहून येणारा सोडियम नावाचा क्षार जमिनीत साठतो व जमिनी चोपण होऊन अतिशय कठीण संरचनेच्या होतात. ब-याच सिंचन क्षेत्रातील (कॅनॉल/ विहीर/ नदी) जमिनी प्रथमतः क्षारयुक्त होतात. या जमिनीमध्ये विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण वाढते परंतु जमिनीची संरचना बिघडलेली नसते. उन्हाळ्यामध्ये पृष्ठभागावर पांढरा क्षारांचा थर आढळून येतो. या क्षारयुक्त जमिनी निचरा व्यवस्थापन, सिंचनास चांगले पाणी वापरणे, मोजक्या पाण्याचा वापर, सेंद्रिय खतांचा व हिरवळीच्या खतांचा वापर करून सुधारता येतात. क्षारयुक्त जमिनीचे कालांतराने क्षारयुक्त चोपण जमिनीत रुपांतर होते. क्षारयुक्त चोपण जमिनीमध्ये विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण जास्त असते. तसेच या क्षारातील सोडीयम मातीच्या कणावर जातो व त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर मातीमिश्रित क्षारांमुळे जमिनीची घडण बिघडते. पृष्ठभागावर तेलकट डागासारखी परिस्थिती दिसून येते. या जमिनी माती परीक्षणानुसार सल्फर अथवा जिप्समचा वापर, भूमिगत निचरा पद्धती, हिरवळीची खते इत्यार्दीचा वापर करून सुधारता येतात. बिघडलेल्या जमिनीचा तिसरा प्रकार हा चोपण जमिनीच्या रुपाने ओळखला जातो. या जमिनीमध्ये विरघळलेल्या क्षाराचे प्रमाण मर्यादित परंतु मातीच्या कणावर सोडीयमचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर कडक पापुद्रे तयार होऊन बियाण्याची उगवणक्षमता कमी होते आणि संरचना अतिशय कडक होते. या जमिनी अतिशय विम्लधर्मीय (सामू८.५ पेक्षा जास्त) असून पावसाळ्यात चिबड तर उन्हाळ्यात अतिशय कठीण होतात. या चोपण जमिनी सुधारविण्यासाठी जिप्समचा शेणखतातून वापर केल्यास मातीच्या कणांवर कॅल्शियम येतो व सोडियम सल्फेट निच-याद्वारे निघून जातो. अशा पद्धतीने जिप्समचा शेणखताबरोबर वापर केल्यास चोपण जमिनी सुधारविता येतात. या चोपण जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असते अशा जमिनीमध्ये जिप्समऐवजी सल्फरचा वापर करावा. भविष्यातील शाश्वत उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापनात खालील गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे पिकांची फेरपालट करून कडधान्य पिकांचा समावेश केल्याने पालापाचोळा जमिनीत पडून सेंद्रिय पदार्थाचे चक्रीकरण होते. तसेच सेंद्रिय खते जसे जमिनीतून द्यावे. माती परिक्षणानुसार खतांचा समतोल वापर अपेक्षित उत्पादन समीकरणाद्वारे केल्यास जमिनीच्या सुपीकतेबरोबर जमीन आरोग्यही चांगले राहील. माती परिक्षणाद्वारे कमतरतेनुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर जमिनीतून सेंद्रिय खतात मिसळून करावा. माती परीक्षण करून विद्राव्य खतांद्वारे ठिबक सिंचनातून अन्नद्रव्ये पीक वाढीच्या अवस्थेत गरजेनुसार द्यावीत. पाण्याचा अमर्याद वापर न करता, बागायत क्षेत्रामध्ये ठिबक, तुषार, मायक्रोस्प्रिकलर पद्धतीचा वापर वाढवावा. मृद व जलसंधारणाची उपाययोजना लोकसहभागातून कोरडवाहू भागात शासनाच्या मदतीने वाढविणे गरजेचे आहे, कारण पावसाचा प्रत्येक थेंब हा जमिनीत मुरविला गेला पाहिजे. शेततळी तयार करून संरक्षित पाण्याचा उपयोग करावा. बागायत क्षेत्रात दोन ते तीन वर्षातून एकदा तरी हिरवळीची पिके म्हणून धंचा किंवा ताग गाड़ला गेला पाहिजे. क्षारपड जमिनीचे क्षेत्र सुधारविण्यासाठी एकात्मिक पद्धतीने पाणलोट क्षेत्रात जिप्सम शेणखतात मिसळून जमिनीत टाकावे. जादा पाण्याचा पश्चिम महाराष्ट्रातील हलक्या जमिनीचे क्षेत्र ठिबक सिंचनावर आणून कोरडवाहू फळबाग लागवड करणे गरजेचे आहे. जास्त पाणी कमी क्षेत्रावर देण्याऐवजी कमी पाणी जास्त क्षेत्रावर विभागून दिल्यास जमिनी खराब होणार नाहीत तसेच उत्पादनात वाढ होईल आणि सामाजिक समतोल राखला जाईल. शेतक-यांनी आपल्याकडील असलेल्या जमिनीची 'आरोग्यपत्रिका' तयार करून त्यानुसार जमीन सुधारणा व पीक पद्धतीचे नियोजन करावे. शेतातील उरलेले पीक अवशेष न जाळता त्यांचा आच्छादन म्हणून उपयोग करावा किंवा बारीक तुकडे करून जमिनीत मिसळावे, म्हणजे संख्या वाढेल. अशा प्रकारे भविष्यात शेतकरीबंधुनी जमीन आरोग्य व सुपीकता सुधारण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. यामध्ये माती परिक्षणावर आधारित रासायनिक खतांचा वापर, जिवाणू खते, भरखते व हिरवळीच्या खतांचा वापर केल्यास रासायनिक खतांची गरज काही प्रमाणात कमी होऊन अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढेल. पर्यायाने जमीन, हवा, पाणी या नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास होणार नाही. स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन