भारतात अनादिकाळापासुन पाणथळ, क्षारयुक्त व चोपण जमिनी आढळेल्या आहेत. परंतु त्यांची नोंद १९ व्या शतकाच्या मध्यापासुन घेतली आहे. सिंचन क्षेत्राच्या वाढीबरोबर अशा जमिनीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. भारतामध्ये इतर कोणत्याही राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हे सर्वाधिक भारी काळ्या जमिनीचे प्रमाण असणारे राज्य आहे. भारी काळ्या जमिनीची कमी निचरा क्षमता, भुपृष्ठापासून कमी खोलीवर असणारा अभ्यंद्य थर, पिकांसाठी पाण्याचा अमाप वापर, खारवट (मचूळ) पाण्याचा शेतीसाठी वापर, कॅनाल/तलाव/धरणे यांच्यातून पाणी पाझरणे, पिकांच्या योग्य त्या फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांचा कमी वापर, वारंवार येणारे पूर, पाऊसमानापेक्षा बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त आणि विस्कळुलैली नैसर्गेिक निचरा पध्दत इ. कारणामुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षारांचे व पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढ्त जाऊन या सुपीक जमिनी नापीक होताना दिसत आहेत. भारतात ११.५३ दशलक्ष हेक्टर आणि महाराष्ट्रात १o लाख हेक्टर क्षेत्र पाणी व क्षार साठविल्यामुळे खराब झाले आहे. सध्या एकूण खराब झालेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ८o टक्के क्षेत्र मध्यम काळी व भारी काळी जमिनीमध्ये आहे. क्षारपड - पाणथळ जमिनी मुख्यत्वे करून पश्चिम विदर्भात अकोला, वर्धा, अमरावती आणि मराठवाडा, ऑर्गांबाद, परभणी व नांदेड या जिल्ह्यांमध्ये आढ्ळतात. जमिनी खराब कशा बनतात मुलतः भारी, खोल काळ्या, जमिनी पुढील कारणांमुळे खराब बनतात. (अ) क्षारांची साठवण (ब) पाणथळ जमिनी अ) क्षारांची साठवण : खालील कारणामुळे जमिनीत क्षारांची वाढ होते क्षारयुक्त पाण्याचा पिकासाठी वापर ऊसासारख्या पिकासाठी पाण्याचा अमर्याद वापर जर पिकास आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी सिंचनाद्वारे दिल्यास भुजलाच्या पातळीत वाढ होऊन जमिनीतील क्षार मुळाच्या कक्षेत येतात. खडकांची झीज आणि नद्यांच्या पाण्यातुन क्षारांची वहातुक आणि सखल जमिनीत साठवण. भारी काळया जमिनी आणि त्यातील नेिचक्यांचा अभाव नैसर्गेिक उताराचा अभाव. यांत्रिकीकरणांमुळे जमिनीचे सपाटीकरण आणि नैसर्गेिक चर बंदी रासायनिक खतांचा वापर. कोटकनाशकांचा वापर ब) पाणथळ जमिनी : ज्या वेळी जमिनीमध्ये एकूण सर्व मार्गाने सोडलेले पाणी हे जमिनीतुन बाहेर पडणारे पाणी आणि पिकांना लागणारे पाणी यापेक्षा जास्त होते, त्यावेळी जमिनी पाणथळ होतात. ज्या वेळी जमिनीमधील पाण्याची पातळी पिकाच्या मुळाच्या कक्षेत येते त्यावेळी ती जमिन पाणथळ होतें, असें समझले जातें. जमिनी पाणथळ होण्याची कारणे अ) नैसर्गिक ब) कृत्रेिम अ) नैसर्गिक कारणे जमिनीच्या खाली भुगर्भाचा कठीण थर वारंवार येणारे महापूर उंच भागातुन सखल भागाकडे पाण्याची वहातुक : पावसाचे प्रमाण जास्त असेल व पावसाचे पाणी वाहून जाण्यास नैसर्गेिक मार्ग उदा. ओढा, नाले. व ओघळ नसेल तर जमिनीत मुरून उरलेले पावसाचे पाणी उंच भागावरून सखल, खोलगट भागाकडे वाहून साचते. या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार जमिनीच्या भुपृष्ठावर साचुन राहण्यास सुरूवात होते. उष्ण व कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊसमान कमी असल्यामुळे जमिनीच्या भुपृष्ठावरील क्षार जमिनीतुन खोलवर व नेिचयाद्वारे वाहुन जात नाहीत. उलट असे क्षार उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या बाष्पीभवनाबरोबर वर येऊन भुपृष्ठावर जमा होतात. ब्र) कृत्रिम किंवा मानव निर्मीत कारणे जमिनींचा प्रकार विचारात न घेता पिकांना पाणीदेण्याची पद्धत बागायती क्षेत्राची अति बांधबंधिस्ती नैसर्गेिक चराचे सपार्टीकरण नैसर्गेिक ओघळ. नाले आणि चर यांची देखरेख आणि स्वच्छता न ठेवणे. सिंचन विभागातील पाण्याच्या पाटाची गळती.: साठवण बंधारे, तलाव व कॅनॉल या पासुन होणा-या सतत झिरप्यामुळे खोलगट भागात पाण्याची पातळी वाढ्ते व हे पाणी ब-याच कालावधीसाठी राहिल्यास जमिनीतील / पाण्यातील क्षिार उन्हाळयात बाष्पीभवनाने जमिनीच्या भुपृष्ठावर साचून राहतात व पाण्याची पातळीही वाढते. क्षारयुक्त आणि चोपण जमिनीचे गुणधर्म क्षारयुक्त , चोपण आणि क्षारयुक्त चोपण जमिनीचे गुणधर्म पुढीलप्रमाणे असतात. गुणधर्म क्षारयुक्त चोपण क्षारयुक्त चोपण सामू ८.५ पेक्षा कमी ८.५ पेक्षा जास्त ८.५ पेक्षा कमी विद्राव्य क्षार डेसीसायमन /मी. ४.० पेक्षा जास्त ४.० पेक्षा कमी ४. ० पेक्षा कमी विनिमययुक्त सोडियम १५ पेक्षा कमी १५ पेक्षा जास्त १५ पेक्षा जास्त पृष्ठभाग पांढऱ्या क्षारांचा रंग राखेसारखा क्षारांचा थर उन्हाळ्यात क्षारांचा पांढरा थर पिक पिकाची वाढ होत नाही पिकाची वाढ होत नाही पिकाची वाढ खुंटते पाणथळ, क्षारयुक्त व चोपण जमिनीत पिकांची वाढ न होण्याची कारणे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे मुळाच्या सानिध्यात हवा खेळती रहात नाही व पिकांना प्राणवायुचा पुरवठा कमी होतो आणि उपयुक्त जिवाणुची वाढ होत नाही. विद्राव्य क्षाराचे प्रमाण वाढल्यामुळे पिके पाणी कमी प्रमाणात शोषुन घेतात. सोडीयम व क्लोराईडचा पिकांच्या वाढीवर प्रतिकुल परिणाम होतो. विद्राव्य क्षाराचे प्रमाण वाढते. मातीच्या कणावरील सोडीयमचे प्रमाण वाढल्यावर जमिनीची घडण बिघडते, अशी माती ओली झाल्यावर चिकट बनते आणि उन्हाळयात कोरडी झाल्यावर कठीण व टणक बनते. घट्ट जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. क्षारपड - पाणथळ जमिन सुधारणा तंत्रज्ञान क्षारपड - पाणथळीच्या समस्येने पडीक होत असलेल्या जमिनीवर वेळीच उपाययोजना केल्या नाही तर या जमिनी सांगली जिल्ह्यातील (५२,ooo हे. जमिन क्षारपड - पाणथळीच्या समस्येने पडीक) मिरज, वाळवा, पलूस व तासगांव तालुक्यातील क्षारपड-पाणथळ जमिनीसारख्या उग्र स्वरुप धारण करु शकतात. अशा जमिनींची सुधारणा करण्यासाठी पुढील उपायांचा एकात्मिकपणे वापर करणे गरजेचे आहे. अ) निचरा पध्दतीचा वापर क्षारपड व पाणथळ जमिनींच्या सुधारणेसाठी निचरा पध्दतींचा वापर करणे अतिमहत्वाचे असते. जमिनीत निच-याचे प्रमाण वाढणार नाही तोपर्यंत कोणतीही भुसुधारके वापरून क्षारपड जमिनी लागवडीखाली आणणे शक्य होणार नाही. म्हणुन निचरा पध्दतीची आखणी ही तंत्रिकदृष्टया व्यवस्थित होणे गरजेचे असते. ही आखणी करताना क्षारपड क्षेत्राचे सव्हॅक्षण, कंटुर नकाशा, निच-याचे पाणी निर्गमीत करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांशी संलग्र असणारे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भुमिगत जलाची पध्दती आणि पीक पध्दती आदी बाबीचा विचार करावा लागतो. निचरा पध्दतीमुळे पुढील फायदे मिळतात विविध पध्दती पिकाच्या वाढीसाठी योग्य असे जमिनीत वातावरण जमिनीत असणा-या पोषक जिवाणूंची वाढ होते. पिकाच्या कार्यक्षम मुळांची खोली वाढली जाऊन पीक जोमदार वाढते. या पध्दतीने जमिनीचा पोत सुधारुन पाणी मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ होते. प्रमाणशीर मशागत करण्यास सोयीस्कर जाते. जमिनीचे तापमान पिकास योग्य असे राखले जाते. जमिनीच्या भुपृष्ठावर क्षार साठवण्याची क्रिया मंदावते व जमिन लागवडीस योग्य होते. वापसा लवकर आल्यामुळे लागवड लवकर करता येते व बिजाकुरण वाढण्यास मदत होते. निचरा पध्दतीमध्ये मुख्यतः जमिनीवरील उघडे चर निचरा पध्दत व भूपृष्ठाखालील (भुमिगत) निचरा पध्दत या दोन पध्दतींचा समावेश होतो.परंतु जमिनीवरील उघडे चर निचरा पध्दतीपेक्षा भूमिगत निचरा पध्दतींचे पुढीलप्रमाणे अनेक फायदे मिळतात. भूमिगत निचरा पध्दत पूर्णतः जमिनीखाली 0.९ ते १.५ मीटर खोलीवर असल्यामुळे जमिनीवरील उघड्याचरीसारखी जमीन वाया जात नाही. उघड्या चरीप्रमाणे वारंवार देखभाल व दुरुस्तीचा खर्च भूमिगत निचरा पध्दतीत नसतो. उघड्या चरीप्रमाणे मातीची धूप होण्याची समस्या भूमिगत निचरा पध्दतीत येत नाही. उघड्या चरीप्रमाणे केवळ भुपृष्ठावरील पाण्याचा व क्षारांचा निचरा न होता भुपृष्ठाखालील पिकांच्या मुळांच्या कक्षेतील अनावश्यक पाणी व क्षार यांचाही निचरा भुमिगत निचरा पध्दतीत होतो. उघड्याचरीप्रमाणे मशागत, आंतरमशागत, अवजारे, वाहतुक इ. कामांना येणारे अडथळे भूमिगत निचरा पध्दतीत येत नाहीत. उघड्याचरीपेक्षा भूमिगत निचरा पध्दत २० ते २५ वर्षे अधिक कार्यक्षमपणे चालू राहते. अशा प्रकारे जमिनीवरील उघड्याचरीपेक्षा अनेक बाबतीत फायदेशीर असणा-या भुमिगत निचरा पध्दतीचा वापर क्षारपड-पाणथळ जमीन सुधारणेसाठी करणे आवश्यक आहे. भुमिगत निचरा पध्दती भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पध्दत : जमिनीच्या पृष्ठभागाखाली 0.१ ते १.५ मीटर खोलीवर सच्छिद्र पी.व्ही.सी. ड्रेनेज पाईप टाकून त्या पाईपाभोवती फिल्टर म्हणून ४.५ ते १० सें.मी. जाडीचा चाळ वाळूचा थर किंवा कापडी फिल्टर (जिओ टेक्सटाईल फिल्टर) गुंडाळून पाईप जमिनीमध्ये गाडाव्यात. या पध्दतीत मुख्यनळी, उपमुख्य नळ्या व उपनळया यांच्या जाळ्यांची अशाप्रकारे रचना केली जाते की, जेणेकरुन पिकांच्या मुळांच्या कक्षेतील क्षार व अतिरिक्त पाणी मातीतून पाझरुन प्रथम उपनळ्यामध्ये येते आणि उपनळ्यातील पाणी उपमुख्यनळ्यामध्ये येऊन मुख्य नळीतून शेवटी हे पाणी नैसर्गिक निगमस्थान उदा. ओढा, ओघळ किंवा नदी इत्यादीमध्ये नेऊन सोडावे. ज्या ठिकाणी असे नैसर्गेिक निगमस्थान उपलब्ध नसेल त्या ठिकाणी मुख्य नळीतील पाणी संपवेल (विहीर) किंवा शेततळ्यामध्ये एकत्र करुन हे पाणी उपसा करावे लागते. या पध्दतीसाठी साधारणपणे दर हेक्टरी रु. १,00,000 ते १,२५,000 इतका खर्च येतो. भूमिगत सच्छिद्र पाईप निचरा पध्दत राबविताना खालील बाबी ध्यानात घ्याव्यात निचरा पध्दतीचे वेगवेगळे आराखडे : सव्हें केल्यानंतर कंटुर नकाशाच्या आधारे शेतजमिन सपाट, कमी उतार, मध्यम उतार किंवा जास्त उतार आहे हे समजु शकते. त्या आधारे सपाट व कमी उतार असणा-या जमिनीस समांतर निचरा प्रणाली, मध्यम व जास्त उताराची जमीन जर 'व्ही' किंवा 'यु' आकाराची असेल त्या ठिकाणी हेरिंगबॉन निचरा प्रणाली तर कॅनॉल, तलाव यामधुन पाझरून येणारे पाणी तसेच जास्त उताराच्या जमिनीकडून सखल भागाकडे वाहुन येणा-या पाण्यास इंटरसेप्टर ड्रेन पध्दत वापरून जमिनी क्षारपड पाणथळ होण्यापासून वाचवू शकतो. वेगवेगळया पिकांसाठी सुरक्षित असणारी भुमिगत पाण्याची पातळी : वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन घटणार नाही, यासाठी कमीतकमी भुमिगत पाण्याची पातळी ठरविलेली असते, ती पुढीलप्रमाणे. अ.क्र. पिक प्रकार जमीन प्रकार वाळूयुक्त जमीन पोयटायुक्त जमीन भारी काळी जमीन १ चारापिके ०.५० ०.६० ०.७० २ तृणधान्य पिके ०.६० ०.७० ०.८० ३ उस,भाजीपाला पिके ०.८० ०.९० १.०० ४ कंदवर्गीय पिके व तेलबिया पिके ०.७० ०.८० ०.९० ५ फळपिके १.०० १.२० १.४० निचरा पाईपची खोली : अभेद्य थराची खोली, उघड्या नाल्याची खोली आणि पिकास सुरक्षित असणारी पाण्याची पातळी या सर्वांचा विचार करुन निचरा पाईपची खोली ठरवावी. मशागतीसाठी वापरल्या जाणा-या यांत्रिक साधनांमुळे सच्छिद्र पाईपला धोका होऊ नये यासाठी पाईप कमीतकमी १0 सें.मी. खोलीवर गाडाव्यात. दोन उपनळ्या (लॅटरल ड्रन) मधील अंतर : निचरा पध्दतीच्या यशस्वीतेसाठी दोन लॅटरल पाईपमधील अंतर योग्य ठेवणे अती महत्वाचे असते. हे अंतर मातीची जलसंचालकता, अभेद्य श्राची खोली, निचरा योग्य सच्छिद्रता आणि कमी कराव्या लागणा-या भूमिगत पाण्याची पातळी इत्यादी बाबींवर अवलंबून असते. भारी ते मध्यम खोल काळ्या जमिनीसाठी हे अंतर १o ते ६० मीटरच्या दरम्यान ठेवावे. लॅटरल व कलेक्टर पाईपसाठी ढाळ : सपाट जमिनितीत निचरा प्रणाली वापरताना उतार दिल्यास पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येणार नाही. पण त्याचबरोबर त्या नेिचरा पाईपची खोली १५ सें.मी. पेक्षा कमी होणार नाही. याचीही काळजी घ्यावी. नेिचरा पाईपला जास्तीतजास्त २ टक्के इाळ द्यावा. पण वेगवेगळ्या व्यासाच्या पाईपसाठी वेगवेगळा कमीतकमी झाळ द्यावा लागतो, तो पुढीलप्रमाणे. पाईपचा व्यास (मी.मी.) ८० १०० १६० २०० २९४ ३५५ ४५५ कमीतकमी ढाळ ०.१० ०.१० ०.०९ ०.०८ ०.०७ ०.०६ ०.०५ निचरा पध्दतीच्या आऊटलेट्सबंधी घ्यावयाची काळजी : आऊटलेटमधुन नाल्यामध्ये पडणा-या पाण्याला अडथळा होऊ नये म्हणुन हे आऊटलेट नाल्यामध्ये असणा-या पाण्याच्या पातळीच्या नेहमी ३0 ते ४५ सें.मी. वर असावे याची दक्षता घ्यावी. आऊटलेट पाईपच्या टोकाला जाळी बसवावी लॅटरल व कलेक्टर पाईपची कमीतकमी व जास्तीतजास्त लांबी : सर्वसाधारणपणे निचरा पाईपची कमीतकमी लांबी ही नेहमी त्या दोन निचरा पाईपमधील अंतराच्या दुप्पट असावी लागते. तर जास्तीतजास्त लांबी ६०० मीटरपर्यंत असते. कारण ढाळ देताना येणा-या अडचणी व आऊटलेटची स्थिती यावरुन लॅटरलची जास्तीतजास्त लांबी ठरवावी लागते. भूमिगत सच्चीद्र पाईप निचरा पद्धतीच्या वापरामुळे क्षारपड - पाणथळ जमीन सुधारणेवर झालेला परिणाम ब) भुसुधारकांचा वापर चोपण जमीन सुधारण्यासाठी जिप्सम, गंधक, फेरस सल्फेट, आयर्न पायराईट, फॉस्पोजिप्सम यासारख्या रासायनिक भुसुधारकांचा उपयोग करावा. १) जिप्सम : माती परिक्षण करून जिप्समची गरज ठरविल्यानंतर आवश्यकतेच्या अर्धा भाग जिप्सम पहिल्या वर्षी आणि उरलेला अर्धा भाग जिप्सम दोन वर्षांनंतर वापरावा. जिप्सममध्ये एक टक्केपेक्षा जास्त सोडियम ऑक्साईडचे प्रमाण असु नये. जिप्सम पावडर जमिनीच्या पृष्ठभागावर वरच्या २० सें.मी. थरात चांगली मिसळुन घ्यावी म्हणजे पावसानंतर भरपुर पाणी मिळुन जिप्समची प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते. जिप्सममधील कॅल्शियमची मातीच्या चिकण कणांना चिकटलेल्या सोडीयमशी प्रक्रिया होऊन सोडियम सल्फेट विद्राव्य असल्याने त्याचा जमिनीतुन निचरा होऊन जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक कमी होतो आणि जमिनीची भौतिक जडण-घडण सुधारते. २) आयर्न पायराईटस : पायराइट्सचा वापर चोपण जमिनी सुधारण्यासाठी होतो. त्यामध्ये गंधक आणि लोहाचे प्रमाण अधिक आहे. पायराईटसमध्ये असलेल्या गंधकावर पाण्याची व हवेतील ऑक्सीजनची तीव्र प्रक्रिया होऊन गंधकाम्ल तयार होते, त्यामुळे जमिनीत सुधारणा होते. यासाठी अमझोरी पायराईटस्चा वापर प्रभावशाली असल्याचे सिध्द झाले आहे. अमझोरी पायराईटस् जमिनीमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये असलेल्या गंधकावर पाण्याची व हवेतील ऑक्सीजनची प्रक्रिया होऊन गंधकाम्ल आणि लोहाचे सल्फेट तयार होते. याबरोबर थायोबॅसीलस या जैविकाचा व सेंद्रिय खताचा वापर केल्यास ही क्रिया जलद होण्यास मदत होते. लोहाच्या सल्फेटवर पुन्हा पाण्याची प्रक्रिया होऊन त्यापासुनही गंधकाम्ल तयार होते. पायराईटस् + पाणी + ऑक्सीजन = लोहाचे सल्फेट + गंधकाम्ल लोहाचे सल्फेट + पाणी = लोहाचे हायड्रॉक्साईड + गंधकाम्ल. अशारितीने तयार झालेले गंधकाम्ल जमिनीतील चुनखडीवर प्रक्रिया करते व त्याचे कॅल्शियम सल्फेट बनविते. चुनखडी + गंधकाम्ल = जिप्सम + पाणी + कार्बन डायऑक्साईड. सदर कॅल्शियम सल्फेट मधील कॅल्शियमचे जमिनीतील सोडियमशी विनीमय होऊन सोडियम सल्फेट तयार होते आणि ते पाण्यात विरघळणारे असल्याने पाण्याबरोबर त्याचा निचरा होऊन जमिनीतील सोडियमचे प्रमाण कमी होते. साधारणतः २ ते ४ टन प्रती हेक्टरी पायराईटची मात्रा चोपण जमिनी सुधारण्यासाठी फायदेशिर ठरते. पायराईट वापरण्यापुर्वी जमिनीस हलके पाणी देऊन पायराईट जमिनीवर एकसारखे मिसळुन टाकावे. क) पिकाची फेरपालट व निवड जमिनीची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने एकच पिक वारंवार न घेता थोडी फेरपालट करणे आवश्यक असते. कायम आडसाली ऊस लावण्यापेक्षा खरीप हंगामात सोयाबीन, भुईमूग यासारखी पिके शिवाय ताग, शेवरी या सारखी हिरवळीची खते घेतल्यास समस्या कमी होऊ शकते. तसेच जमिनीत सतत काहीतरी पिक घ्यावे. जमिन पडिक राहु नये. ज्यावेळी पिक घेणे शक्य नसेल त्यावेळी बरसिम, लुसर्ण, पॅराग्रास, करनाल गवत लावावे. शिवाय क्षार प्रतिकारक्षमता असलेल्या पिकांची निवड करणे फायद्याचे ठरते. क्षार व चोपण जमिनीसाठी पिकांची संवेदनशिलता पिकाचा प्रकार क्षार संवेदनशील मध्यम संवेदनशील जास्त सहनशील अन्नधान्य पिके उडीद ,तूर ,मुग,वाटणा ,तीळ गहू , बाजरी ,भात ,मोहरी,करडई,मका ,सोयाबीन ,एरंडी ,सुर्यफुल ,जवस उस,कापूस भाजीपाला पिके चवळी ,मुळा,श्रावण घेवडा कांदा,बटाटा ,कोबी ,टोमॅटो ,गाजर पालक ,शुगरबीट फळबाग पिके संत्रा , आंबा , बदाम ,सफरचंद चिक्कू ,डाळिंब ,अंजीर ,पेरू ,द्राक्षे नारळ ,बोर ,खजूर ,खारीक वन पिके साग,सिरस,चिंच लिंबू ,बाभूळ विलायती बाभूळ ,सिसम ,निलगिरी चारा पिके ब्ल्यू प्यानिक , पांढरे व तांबडे फ्लोअर पॅरागवत ,जायट गवत ,सुदान गवत बरसीम ,रहोडस गवत , बरमुडा गवत ड) जमिनीचे व्यवस्थापन जमिनीचे सपाटीकरण : ज्या जमिनी उंच सखल आहेत किंवा अति चढ उताराच्या आहेत, अशा जमिनीसाठी सपाटीकरण करणे आवश्यक आहे. शेतात उंचवट्याच्या ठिकाणी पाणी पोहचत नाही किंवा कमी प्रमाणात पोहचते व सखल भागात ते वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात साठते. शिवाय वाजवीपेक्षा जास्त उतार असेल तर वाफ्यात किंवा सन्यात दिलेले पाणी उतारा-याच्या दिशेने निघुन जाते व सन्यांना किंवा वाफ्यांना पाणी कमी उपलब्ध होते. क्षार समस्या असलेल्या जमिनीत व पाण्याची पातळी ज्या जमिनीत जास्त वाढलेली आहे, त्या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. पावसाचे पाणी सुध्दा ते उताराच्या दिशेने चरीत सोडणे गरजेचे आहे, त्यामुळे पाणी तुंबून न राहिल्यामुळे जमिनीत पाण्याची पातळी कमी ठेवता येते. त्यामुळे भारी जमिनीत 0.0५ ते 0.२५ टक्के, मध्यम जमिनीत 0.२0 ते 0.४0 टक्के व हलक्या, रेताड़ जमिनीत 0.२५ ते 0.३५ टक्के उतार समाधानकारक असतो. पाणी नियोजनः जमिनीची क्षारता कमी करण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा झाल्यानंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढू नये या साठी भरमसाठ पाण्याचा वापर कमी केला पाहिजे. ठिबक सिंचनासारखे प्रभावी अस्त्र वापरले पाहिजे. ठिबक सिंचनातून भुगर्भातील मचुळ अथवा खारवट पाण्याचा उपयोग कार्यक्षमरित्या करता येतो. पाण्याची प्रत, क्षाराचे प्रकार व प्रमाण तसेच जमिनीची प्रतवारी पहाणे हे आवश्यक असते. पाण्यातील विद्राव्य क्षार २ooo मिलीग्रॅम/ लिटरपर्यंत असल्यास ते पाणी ठिबक सिंचनासाठी वापरता येते, या संचामुळे होणारे ओलीत क्षेत्र हे एकमेकावर २0 टक्के झाकले जाणे गरजेचे आहे. यात तोटीजवळ सतत ओलावा त्याकरीता तोटीजवळ पिकाची लागण करणे फायद्याचे ठरते. जमिनीची मशागतः जमिनीत खोलवर मशागत केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहुन पाणी मुरण्याची क्षमता वाढते व पृष्ठभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. सब सॉयलरसारखे अवजार वापरून खोलवर नागरणी करता येते. माती परीक्षण: खराब जमिनीचे व्यवस्थापन करण्यापुर्वी या जमिनी कोणत्या प्रकारच्या आहेत, त्याची तपासणी करावी व नंतर सुधारणेचे उपाय करावेत. खतांची मात्रा सुध्दा माती परीक्षण करून द्यावी. रासायनिक खते: क्षार व चिबड जमिनीतुन नत्राचा ब-याच प्रमाणात -हास होतो. त्यासाठी नत्र खताची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्के जास्त देणे फायद्याचे ठरते. त्याशिवाय स्फुरद, लोह, व जस्ताची कमतरता सुध्दा आढळते, त्यासाठी कंपोस्ट खतासोबत रासायनिक खते वापरणे गरजेचे असते. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकविता येते. कंपोस्ट कल्चरचा वापरः क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी अनेक मार्गाचा एकत्रितपणे अवंलब करावा लागतो. कंपोस्ट कल्चरचा वापर वगैरे टाकाऊ सेंद्रीय पदार्थापासून कंपोस्ट खत तयार करून क्षारपड मार्गावर असणा-या जमिनी थोपवून धरण्याचा एकमेव मार्ग आहे. कंपोस्ट खताचा क्षारपड जमिनीत वापर केल्याने माती कणांची रचना बदलते आणि हवा पाणी यांचे प्रमाण प्रमाणशिर राहते. परिणामत: जादा पाणी निचरा होण्यास मदत होते. जमिनीतील उपयुक्त जिवाणुचे प्रमाण वाढवून त्यांचे कार्य उत्तम प्रकारे चालण्यास मदत होते. सारांश-कंपोस्ट खत हे एक टॅनिक आहे. तसेच खास बाब म्हणून ज्या क्षारपड जमिनीतून सुधारणा घडवून आणलेल्या आहेत, तेथे खारीचा वाटा म्हणुन का असेना कंपोस्ट खताचा वापर बहुगुणी आहे. गतीमानतेने कार्यक्षम करण्यास त्याची जरुरी आहे. क्षारपड होऊ घातलेल्या जमिनी सुधारण्यासाठी कमी खर्चातील अॅझो, रायझो यासारख्या जिवाणूंचा वापर करणे गरजेचे आहे. हे जिवाणू हवेमधील नत्र पिकांना मुळावाटे उपलब्ध करून देतात. क्षार जमिनीत शेवरी, र्धेचा, व क्लोव्हरची पिके चांगली वाढतात व नत्र स्थिर करतात. शिवाय क्षार शोषून घेतात म्हणुन क्षारयुक्त जमिनी सुधारण्याचा हा सुध्दा एक मार्ग आहे. आच्छादनाचा वापरः क्षारपड जमिनी शक्यतो मोकळ्या ठेवू नयेत कारण जमिनीच्या खालच्या थरातील क्षार बाष्पीभवनामुळे पृष्ठभागावर येतात. हे टाळण्यासाठी शेतातील सेंद्रिय पदार्थाचा उदा. ऊसाचे पाचट, गव्हाचा भुस्सा, पालापाचोळा, काड्यांचा आच्छादन म्हणून वापर करावा. आच्छादनामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होवून जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. त्यामुळे पिकास द्याव्या लागणा-या एकूण पाण्याची गरज कमी होवून जमिनी क्षारपड-पाणथळ होण्याचा धोका कमी करु शकतो. जमिनी क्षारयुक्त किंवा चोपण होऊ नये म्हणुन घ्यावयाची काळजी. जमिनी सपाट असाव्यात व बांधबंदीस्ती करावी. जमिनीमध्ये पाणी साठवून राहणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीतुन पाण्याचा निचरा चांगला होण्यासाठी योग्य अंतरावर चर काढावेत. जमिनीतील पाण्याची पातळी २ मिटरच्या खाली ठेवावी. पिकाच्या वाढीसाठी जरुरीप्रमाणेच पाणी द्यावे. विशेषतः ऊस पिकास खत व पाणी योग्य प्रमाणात द्यावे. आपल्या भागातून कालवा वाहत असल्यास त्यामधून पाणी झिरपु देऊ नये. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ व हिरवळीचे खते वापरुन मातीची घडण चांगली ठेवावी. त्यामुळे हवा खेळती रहाते व ज्यादा पाण्याचा निचरा होण्यासाठी मदत होते. विहीरीचे पाणी खारट असल्यास असे पाणी जमिनीस वापरु नये. माती व पाणी नेहमी तपासून जमिनीचे भौतिक आणि रासायनिक बदल याबाबत माहिती मृदशास्त्रज्ञाकडून मिळवावी. सुक्ष्म जलसिंचन पध्दती वापराव्यात. उदा. ठिबक सिंचन, तुषार क्षार व चोपणयुक्त जमिनीसाठी प्रतिकार करणा-या पिकांची निवड करावी. कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथील शिफारशी भारी काळ्या क्षारयुक्त चोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी सच्छिद्र पाईप भूमिगत निचरा प्रणाली (१.२५ मीटर खोली, दोन पाईपमधील अंतर २५ मीटर)आणि जिप्सम आवश्यकतेच्या ५० टक्के व हिरवळीचे पीक धैचा यांचा एकात्मिक वापर फायदेशीर आढळून आला आहे. क्षारयुक्त चोपण जमिनीत निलगिरी, सुबाभुळ, सुरू आणि रामकाठी बाभुळ या झाडांची चांगली वाढ होते परंतु आवळा, चिंच, बोर, शेवगा, लिंब, आणि करंज या झाडांची वाढ होत नाही. क्षारयुक्त चोपण आणि दलदलीच्या जमिनीत करनाल गवताची वाढ चांगली होते. करनाल गवताला प्रति हेक्टरी २५ किलो नत्र आणि उन्हाळयात पाणी देणे आवश्यक आहे. कमी निचरा असणा-या भारी काळ्या जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या मोल नांगराची शिफारस करण्यात येत आहे. कमी निचरा होणा-या भारी काळ्या जमिनीमधून पिकांचे अधिक उत्पादन घेण्यासाठी मोल निचरा पध्दतीत दोन मोलमधील अंतर ४ मीटर व ६0 सें.मी. खोली ठेवण्याची शिफारस करण्यात येत आहे. ६) महाराष्ट्रातील भारी काळ्या पाणथळ आणि जास्त खोलीवर अभेद्य थर असणा-या जमिनीमध्ये भूमिगत निचरा पध्दतीने आरेखन करण्यासाठी (निचरा पाईपचे अंतर व खोली काढण्यासाठी) कॅनशिल्फगारडे (अनस्टेडी) या सूत्राची शिफारस करण्यात येत आहे. स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन