रोगांप्रमानेच रोपवाटीकेचे किडींपासून संरक्षण करणे महत्वाचे आहे. मातृवृक्ष, कलमे, रोपे, बियाणे या सर्वांनाच किडीपासून धोका पोहोचतो. या किडी मुळांवर, खोडावर, फांद्यांवर, पाने, फुले, फळे, बियांवर हल्ला करतात. मातृवृक्षावर आढळणा-या महत्वाच्या किडी आंबा - खोडकिडा, शेंडे पोखरणारी अळी, तुडतुडे, वाळवी. चिकू - मोहोरपोखरणारी अळी, पाने गुंडाळणारी अळी. डाळींब - खोडकिडा, सूरशा, साल पोखरणारी अळी. पेरू - पिठ्या ढेकूण, साल खाणारी अळी. द्राक्ष - उडद्या, पिठ्या ढेकूण. आवळा - साल पोखरणारी अळी, खोड पोखरणारी अळी. सीताफळ - पिठ्या ढेकुण किडीमुळे मातृवृक्षाचे होणारे नुकसान मातृवृक्ष कमकुवत होतात. डोळकांड्या कमी मिळतात . डोळकांड्या कमकुवत निपजतात किडींची प्रसार कलमे ,रोपांवर होतो. बी कमकुवत निपजते कीड बंदोबस्तासाठी उपाययोजना कीडनाशकाचे प्रकार : यात पोटविषे, धुरविषे, स्पर्शविषे यांचा समावेश होतो . त्यानुसार त्यांची निवड करून फवारणी कार्यक्रम राबवावा. बुरशीनाशके व कोडनाशके वापरताना घ्यावयाची खबरदारी योग्य औषधांची निवड करावी. बुरशीनाशके व कोडनाशके यांचा जरुरीप्रमाणे एकत्रित वापर करावा. रोपवाटीकेतील किडींची ओळख व नियंत्रणाचे उपाय अ.क्र. किडीचे नाव ओळख खुणा नियंत्रणाचे उपाय १ माईटस अतिसूक्ष्म कीड , पानातील रसाचे शोषण करते मिथिल डेम्याटॉन (२५ टक्के) १ मी.ली. १.५ लिटर पाण्यात : गंधक (८० टक्के) पाण्यात विरघळणारे २.५ ग्रॅम फवारावे .(१५ दिवसांच्या अंतराने) २ लिंबूवर्गीय फळपिकावरील हिरवी अळी अळी सुरुवातीस भुरकट , नंतर गर्द हिरवी पाने खाते. ५० टक्के कार्बावरील २ ग्रॅम प्रतीलिटर पाण्यात किंवा न्यूवाक्रॉन १ मी.ली. प्रती लिटर पाण्याहून फवारणी करावी ३ पाने पोखरणारी अळी अळी लहान , हिरवट , पांढरी असून पाने पोखरून आतील भाग खाते. मेलीथियॉन (५० टक्के ) २ ग्रॅम प्रतीलिटर पाण्यात किंवा डायमेथोएट(३० टक्के) ०.२५ ते १ मी.ली. प्रतिलिटर पाण्यातून फवारावे . ४ मावा हिरवा किंवा पिवळा रंग , १ मी.मी. लांब कोवळ्या पानातून रस शोषन केल्याने पाने निस्तेज दिसतात. कार्बारील ( ५० टक्के ) २ ग्रॅम प्रतीलिटर पाण्यात किंवा मोनोक्रोटोफॉस १ मी.ली. प्रतिलिटर पाण्यातून फवारावे ५ पिठ्या ढेकुण पूर्ण वाढलेली पिल्ले , किडी पाने व कोवळ्या फांद्यांवर रस शोषण करतात . वरीलप्रमाणे फक्त फवारणी २ वेळा औषधी बदलून करावी. ६ भुंगेरे पांढरट पिवळ्या अळ्या मुळांवर व पानावर भुंगेरे छिद्रे करून उपजीविका करतात. लिंडेन (६५ टक्के) भुकटीची धुरळणी करावी. ७ वाळवी वाळवी (कामकरी) झाडाच्या बुंध्याला/नवीन कलमास अपय करतात. वाळवीचे वारूळ खणून राणीचा नाश करावा त्यात १० टक्के मेलॅथियॉन भुकटी हेक्टरी १२५ किलो प्रमाणे मिसळावी औषधाचे दिलेले प्रमाण पाळावे. औषधे नीट विरघळवून, मिसळून वापरावीत. कडक उन्हात, वा-यात फवारणी टाळावी. गरजेप्रमाणे स्टिकर, स्प्रेड़र एजट वापरावेंत. फवारणी द्रावणाचा सामू किंचित आम्लधर्मीय राखावा. दोन फवारणीत योग्य ते अंतर ठेवावे. जैविक किडींचा वापर काही किडी बुरशीसाठी दुस-या किडींचा/ बुरशीचा वापर करून हानिकारक किंडींचा/ रोगांचा बंदोबस्त करता येतो. उदा. क्रोपटलीमस मुंगेरे हे पिठ्या ढेकणासारख्या रसशोषक किडींवर उपजीविका करून त्यांचा नाश करतात. ट्रायकोडर्मा विरीडी ही बुरशी फ्युर्जेरीयम, पिथीयम यासारख्या बुरशींचा नाश करते. एकात्मिक कीड व्यवस्थापन एकात्मिक किड व्यवस्थापन म्हणजे अशी पद्धत यामध्ये वातावरणाशी समन्वय साधून किडींची/ रोगांची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे. यामध्ये यांत्रिक, भौतिक, रासायनिक, जैविक, अनुवांशिक, पर्यावरणीय, कायदेविषयक अशा सर्व पद्धतींचा एकत्रित वापर केला जातो. फेरोमोन सापळ्यांचा वापर कीटक स्वजातीयांशी संवाद साधण्यासाठी आपल्या शरीरातून विशिष्ट गंध असलेले रसायन बाहेर सोडतात. यालाच फेरोमोन असे म्हणतात. समागमासाठी सहचर शोधण्यासाठी लिंगविषयक फेरोमोनचा उपयोग होतो. याच फेरोमॉनचा वापर केिडींचे पतंग सापळ्यामध्ये आकर्षित करुन नष्ट करण्यासाठी केला जातो. स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन